पिंपरीतील वायसीएम रुग्णालयासाठी उभारली ऑक्‍सिजन टँक 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

  • सरकारकडून वीस हजार केएल क्षमतेच्या टॅंकला परवानगी 

पिंपरी : शहरातील रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये, यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या आवारात वीस हजार किलोलिटर (केएल) लिटर क्षमतेची ऑक्‍सिजन टॅंक उभारली आहे. तिला सरकारची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. 

तरुणांनो, मावळात कृषी पर्यटनातून मिळवा रोजगार

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मल्टिस्पेशालिटी सुविधा आहेत. शिवाय, पदव्युत्तर अभ्यासक्रमासही परवानगी मिळाली आहे. सध्या कोरोनासाठी रुग्णालय राखीव आहे. तेथील ऑक्‍सिजन टॅंकची क्षमता केवळ दहा केएल इतकी होती. त्यामुळे ऑक्‍सिजन सिलिंडरवर अवलंबून राहावे लागत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी 20 केएल टॅंकची उभारणी केली होती. मात्र, त्याला सरकारची परवानगी मिळालेली नव्हती. आता परवानगी मिळाल्याने तीस केएल ऑक्‍सिजन आयसीयूसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णालयात 125 आयसीयू ऑक्‍सिजन बेड उपलब्ध होतील. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येत्या एक-दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार असून, रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर तीस हायफ्लो ऑक्‍सिजनचे एचडीओ युनिटही तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कायमस्वरूपी ऑक्‍सिजन उपलब्ध असेल. तसेच, पूर्वी रुग्णालयात जम्बो सिलिंडरद्वारे ऑक्‍सिजन पुरवठा केला जात होता. आता सिलिंडर राखीव राहणार असल्याचेही ढाके यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: liquid oxygen tank for ycm hospital in pimpri