'क्रेडाई पुणे मेट्रो'तर्फे जिजामाता रुग्णालयास केली ही मदत

'क्रेडाई पुणे मेट्रो'तर्फे जिजामाता रुग्णालयास केली ही मदत

पिंपरी : कोरोनाचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. त्यांच्या जोडीला शहर परिसरातील सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात दिला आहे. त्यात भर टाकली आहे. त्यांनी महापालिकेच्या पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात सीएसआर फंडातून आयसीयू वॉर्डसाठी आवश्यक 12 बेड, व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक साहित्य देण्यात आले.

पिंपरीमधील जिजामाता रुग्णालयातील आयसीयू वॉर्डच्या उभारणीसाठी क़्रेडाईने मदत करावी असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले होते. त्यामुळे उपाध्यक्ष अनिल फरांदे, संतोष कर्नावट, डॉ. दिवाकर अभ्यंकर यांनी अल्पावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आजचा हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.

क्रेडाईचे सुहास मर्चंट म्हणाले, ''क्रेडाई पुणे मेट्रोच्या माध्यमातून मागील अडीच महिन्यात पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए विभागात, पोलिस विभाग, ससून हॉस्पिटल, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय विभागातील आवश्यक साहित्य खरेदीसाठी आणि गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यासाठी 15 कोटी रुपये सीएसआर फंडांतर्गत देण्यात आले आहेत.''

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, राज्यात कोरोनाची सुरुवात झाली. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहर नंबर एक वर होते. शहरात वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे प्रशासन अत्यावश्यक सेवासुविधा उभारण्यासाठी युद्ध पातळीवर काम करीत होते. त्याचेच फलित म्हणून भोसरीत नवीन 100 बेडचे व पिंपरीतील 120 बेडचे जिजामाता रुग्णालय पूर्ण करण्यात आले. जिजामाता रुग्णालयात आयसीयू वॉर्डसाठी आवश्यक असणारे साहित्य देण्यासाठी क्रेडाई मेट्रो पुणे संस्थेने मदत केली. 

क्रेडाई पुणे मेट्रो संस्थेने जिजामाता रुग्णालयास सोमवारी साहित्य दिले, त्यावेळी महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, उपाध्यक्ष अनिल फरांदे, खजिनदार आय.पी. इनामदार, सदस्य विनोद चांदवानी, संतोष कर्नावट, सतीश अगरवाल, डायरेक्टर जनरल डॉ. दिवाकर अभ्यंकर, क्रेडाईचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापौर माई ढोरे म्हणाल्या की, पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर, लिंकरोड या भागातील रहिवाशांना जिजामाता रुग्णालयासारख्या अद्ययावत रुग्णालयाची गरज होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिजामाता रुग्णालयाचे काम प्रशासनाने युद्ध पातळीवर पूर्ण करून अल्पावधीतच आयसीयू वॉर्डचीदेखील उभारणी पूर्ण केली आहे. यामुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होऊन इतर भागातील नागरिकांना या सेवासुविधेचा लाभ होईल. प्रस्ताविक अण्णा बोदडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com