esakal | सांगवी पोलिस ठाण्याला जलसंपदा विभागाची जागा
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवी पोलिस ठाण्याला जलसंपदा विभागाची जागा

सांगवी पोलिस ठाण्याला जलसंपदा विभागाची जागा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी: जलसंपदा विभागाची सांगवी येथील वीस गुंठे जागा सांगवी पोलिस ठाण्याला देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षापासून महापालिकेच्या गाळ्यांमध्ये असलेल्या पोलिस ठाण्याला कायमस्वरूपी जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: पिंपरी : इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरील फ्लॅटला आग

मंत्रालय झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जलसंपदा विभागाचे अधिकापी उपस्थित होते. महापालिका आयुक्त ऑनलाइन उपस्थित होते. १५ सप्टेंबरपर्यंत स्थळ पाहणी अहवाल करण्याचे नियोजन असून, एक महिन्याच्या आत महापालिका, जलसंपदा विभाग व पोलिस प्रशासनाकडून कार्यवाही अपेक्षित आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सांगवी पोलिस ठाण्याला स्वतंत्र जागा मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होतो.

त्यानुसार महापालिकेच्या विविध जागांबाबत सूचनाही केल्या होत्या. परंतु पाटबंधारे वसाहतीलगत जलसंपदा विभागाची जागा रिकामी असून त्यातील वीस गुंठे क्षेत्र पोलिस ठाण्याला देण्यासाठी तत्त्वतः मान्यता झाली आहे. पुढील कार्यवाही जलसंपदा प्रशासन व पोलिस प्रशासन लवकरच पूर्ण करेल, अशी खात्री आहे. याबरोबरच महापालिकेच्या असलेल्या दहा गुंठे जागेलगत या वीस गुंठे जागा मिळणार असल्याने पोलिस ठाण्याला प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे.’’

"सांगवी पोलिस ठाण्याची निर्मिती २०१४ पूर्वी अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळेच झाली होती. आता हक्काची जागाही त्यांच्या निर्णयामुळेच मिळत आहे. पीडब्ल्यूडी मैदान अशी ओळख असलेल्या या जागेवर पोलिस ठाणे उभे राहणार आहे. क्रीडा संकुल उभारण्याचा मानस असून त्यासाठीही अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे."- प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

loading image
go to top