esakal | पिंपरी : इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरील फ्लॅटला आग
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

पिंपरी : इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरील फ्लॅटला आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपळे निलखमधील विशालनगर येथील इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली. यामध्ये दोनजण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. १२) दुपारी घडली. श्री गोविंद मिलाने (वय २०) , रेखा मिलाने (वय ४५) अशी जखमींची नावे आहेत. विशालनगर येथे ओपुला ही सोसायटी असून येथे एकोणीस मजली इमारत आहे.

यातील सोळाव्या मजल्यावरील एका फ्लॅटला रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये फ्लॅटमधील लाकडी फर्निचर जळाल्याने मोठ्याप्रमाणात धूर पसरला. तातडीने सर्व इमारत रिकामी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रहाटणी अग्निशमन केंद्राचे एक व मुख्य अग्निशमन केंद्राचे दोन अशी एकूण तीन वाहने २७ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाली.

हेही वाचा: पिंपरी : पंचवीस लाखांची मागितली खंडणी; सातजणांना अटक

तातडीने सोसायटीमध्ये बसविण्यात आलेल्या फायर हायड्रंट सिस्टीमचा वापर करून पाण्याचा मारा करीत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. एका तासाच्या प्रयत्नानंतर सम्पूर्ण आग विझविण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, दोन्ही जखमीना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

loading image
go to top