महावितरणची थकबाकी कोट्यावधीत, वसुलीला अधिकारी दारोदारी

 lockdown,  electricity bill, pimpari chinchwad
lockdown, electricity bill, pimpari chinchwad

पिंपरी : लॉकडाउनमधील वाढीव बिलामुळे ग्राहक आणि थकबाकीमुळे महावितरण घायकुतीला आहे आहे. राज्य सरकारच्या सवलत मिळण्याच्या आशेवर वीजग्राहकांनी भरणा केलाच नाही. परिणाम शहरात थकबाकीदारांची 2 लाख 32 हजार झाली आहे. त्यांच्याकडे 204 कोटी रूपयांची थकबाकी आहे. आता थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दारोदारी फिरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

वीजग्राहकांना 'अनलॉक' नंतर मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहे. यापूर्वी लॉकडाऊनमधील वीजबिलांबाबत महावितरणकडे हजारो तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावर सर्व ग्राहकांचे बिलांबाबत शंकानिरसन केले. त्यावर ग्राहकांनी देखील वीजबिल रिडींगप्रमाणे अचूक असल्याचे मान्य केले, तरी वीजबिल भरण्याचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे शहरात मार्चअखेर एक लाख 11 हजार 400 ग्राहकांकडे सुमारे 43 कोटी रूपयांची थकबाकी झाली. डिंसेबरअखेर ही थकबाकी 204 कोटींवर गेली आहे. तर थकबाकीदार ग्राहकांची संख्या 2 लाख 32 हजार आहे. आता वसुलीसाठी महावितरणने नंबर कसली असून पाचशे कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर थकबाकी वसुलीचा बोजा टाकला आहे.

वीज खरेदी करायची कुठून?

गेल्या वर्षीच्या तुलनेत थकबाकीमध्ये चौपट वाढ झाली आहे. वाढत्या थकबाकीच्या पार्श्‍वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्‍यकता आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे 80 ते 85 टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. "अनलॉक'मुळे वाणिज्यिक वापर, सणासुदीचे दिवस, औद्योगिक उत्पादनामुळे या महिन्यापासून प्रामुख्याने औद्योगिक, वाणिज्यिक व कृषिपंपांच्या वीजमागणी मोठी वाढ होत जाणार आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्‍न महावितरणसमोर उभा ठाकणार आहे.

वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय

महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध केली आहे. या योजनेत वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. चालू वीजबिलाच्या रकमेचे हप्ते देण्याबाबत वीजग्राहकांच्या अर्जांवर 7 दिवसांत तर वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांच्या अर्जांवर 15 दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महावितरणचे आवाहन

कोरोना संकटासह नैसर्गिक आपत्तीच्या प्रतिकूल परिस्थितीत महावितरणकडून अहोरात्र ग्राहकसेवा दिली जात आहे. महावितरणच्या या गंभीर आर्थिक कोंडीच्या परिस्थितीत वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. याशिवाय लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल ऍप किंवा इतर "ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. यासोबतच "लॉकडाऊन'मधील वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. 

आकडे बोलतात
महावितरण विभाग / थकबाकी / थकबाकीदार / वसुली कर्मचारी/
- भोसरी / 115 कोटी 60 लाख/ 1 लाख 16 हजार / 300
-पिंपरी /88 कोटी 30 लाख/ 1 लाख 16 हजार /250

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com