Pimpri News : स्टॅलिनशी युती तोडणार का? बावनकुळे यांचा शरद पवार, उद्धव ठाकरे यांना प्रश्न

लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ‘महाविजय-२०२४’ अभियान सुरू केले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankuleesakal

पिंपरी - तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिनने हिंदू संस्कृती गाडून टाकण्याची घोषणा केली आहे. अशा पक्षाशी असलेली युती तोडणार का? असा माझा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना प्रश्न आहे, त्यांनी उत्तर द्यावे,’’ अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ‘महाविजय-२०२४’ अभियान सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मावळ लोकसभा दौरा, घर चलो अभियानाच्या निमित्ताने बावनकुळे बुधवारी (ता. ११) पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रात आले होते. त्यामध्ये त्यांनी काळेवाडीतील सभागृहात पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

त्यानंतर पिंपरी कॅम्पातील शगून चौक ते साई चौकापर्यंत ‘घर चलो अभियान’ राबवले. प्रत्येक दुकानात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर साई चौकात झालेल्या सभेत त्यांनी पवार व ठाकरे यांना स्टॅलिन यांच्या पक्षाशी युती तोडणार का? असा प्रश्न केला. आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडमधील १४४४ लोकांशी मी आतापर्यंत संवाद साधला आहे. १४४२ लोकांनी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये पंतप्रधान होतील, असे सांगितले. पण, त्यांना हरवण्यासाठी एकत्र आलेल्या २८ पक्षांच्या नेत्यांची गेल्या महिन्यात मुंबईत बैठक झाली. मोदींना हटवल्याशिवाय राहणार नाही, अशी खूणगाठ त्यांनी बांधली, पण जनतेच्या मनात मोदीच पंतप्रधान होतील, असा विचार आहे.’

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची हजेरी

‘आतापर्यंत आपण राज्यात पूर्ण बहुमताने सत्तेत कधीच आलो नाही. गुजरात, राजस्थानमध्ये पूर्ण बहुमताने भाजप सत्तेत येते. महाराष्ट्रात एकहाती सत्ता येत नाही, याची खंत वाटते,’ अशी नाराजी बावनकुळे यांनी व्यक्त केली. काळेवाडीत आयोजित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘यापुढे सर्वांनी महाविजय करण्यासाठी झपाटून काम करा. पुढील १५ वर्षे भाजप सत्तेतून हटणार नाही,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘पक्षाचे केलेले काम जो सरल अॅपवर पाठवेल, ६०० घरी जाईल. त्यालाच महापालिकेची उमेदवारी मिळेल.’ आजपासून गटबाजीचे राजकारण संपवून टाका, नेत्यांनी गटबाजी संपवली तरच महाविजय होईल. पिंपरी-चिंचवडमधील एकही मत दुसरीकडे गेले नाही पाहिजे. १३ महिने दररोज तीन तास काम करा, असेही त्यांनी सांगितले.

बारामती मतदारसंघ जिंकणार

‘बारामती लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकणार,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ‘महाविजय-२०२४’ अंतर्गत शहरात आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘मावळच्या जागेचीही आम्हाला चिंता नाही. आम्हाला केवळ नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे आम्ही काळजी करणार नाहीत. उमेदवार कोण आहे, ते बघणार नाहीत. भाजपच्या २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभेत आम्हाला उमेदवार निवडून आणायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com