Lonavala News : सलग सुट्यांमुळे ‘द्रुतगती’वर खोळंबा

लोणावळा-खंडाळा ‘हाउसफुल्ल’; व्यावसायिकांमध्ये चैतन्य
Lonavala Expressway Traffic
Lonavala Expressway TrafficSakal

लोणावळा - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा-खंडाळ्यातील हॉटेल व रिसॉर्ट हाउसफुल्ल झाले आहेत. वीकेंड व स्वातंत्र्यदिनास जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे लोणावळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली.

स्वातंत्र्यदिनास पर्यटनाचा ट्रेंड वाढू लागला असून, या दिवशी लोणावळ्यात वर्षाविहारासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होते. वीकेंड आणि स्वातंत्र्यदिनास जोडून आलेल्या सुटीमुळे पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे.

अनेकांनी हॉटेल व रिसॉर्ट आरक्षित केले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वर्दळ सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्य पसरले आहे. ‘एमटीडीसी’चे कार्ला येथील निवासस्थानातील १५ ऑगस्टपर्यंत बुकिंग शंभर टक्के झाल्याची माहिती निवास व्यवस्थापक सुहास पारखी यांनी दिली.

पर्यटकांमुळे शनिवारी व रविवारी बोरघाटात द्रुतगती मार्गावरील वाहतूक कासवगतीने सुरू होती. रविवारीही पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचे चित्र होते. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या रांगा जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत लागल्याचे पहावयास मिळाले.

मुंबई-पुणे लेनवर वाहतूक अमृतांजन पूल, अंडा पॉइंट, दस्तुरीच्याही पुढे गेली. पर्यटकांना बोरघाटात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला. वाहतुकीवर ताण आल्याने वाहतूक सुरळीत करताना पोलिस कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com