लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी, महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा
लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी, महामार्गावर वाहनांच्या लांब रांगाsakal

लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी, महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा

पुन्हा एकदा कोरोनाचा धसका

लोणावळा : सरत्या वर्षाच्या पहिल्याच वीकेंडला लोणावळा, खंडाळा पर्यटकांनी खुलून गेले होते.  शनिवार व रविवार हे दोन दिवस मज्जा करण्यासाठी पर्यटक  लोणावळा, खंडाळा परिसरात तसेच ग्रामीण भागात दाखल झाले. बहुतांश रिसॉर्ट, हॉटेल व बंगले हाऊसफुल्ल झाले आहेत. लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांवरील  बंदी नुकतीच उठविली आहे. लायन्स पॉईंट, खंडाळा भागातील राजमाची पॉईंट, अमृतांजन पुलावरील ड्युक्स नोज पॉईंट, सनसेट पॉईंट याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत सेल्फी घेताना दिसत होते. कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड, राजमाची परिसरात पर्यटकांची पसंती मिळाली.

लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी, महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा
उल्हासनगरात जगप्रसिद्ध मंदिरातील दानपेटीवर माजी सुरक्षा रक्षकाचा डल्ला

महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी

पर्यटकांच्या वाहनांमुळे लोणावळ्यात पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली. भोरघाटातील वाहतूकही संथ गतीने सुरू होती. पर्यटक वाहनांमुळे झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर पोलीस कर्मचारी व वॉर्डन काम करत होते. ॲम्बी व्हॅली येथे बाईक रॅली साठी मोठ्या संख्येने बाईकस्वार लोणावळ्यात दाखल झाले, त्यामुळे आंबवणे रस्त्यावर वाहतुकीवर ताण आला.

पुन्हा एकदा कोरोनाचा धसका

कोरोनाच्या ओमायक्रोन या नवीन व्हेरियंटमुळे जगाची चिंता वाढली असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन तर होणार नाही ना याचा स्थानिक व्यावसायिकांनी धसका घेतला आहे. लोणावळा, खंडाळा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजू लागली आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे पर्यटन व्यवसायास फटका बदलल्याने अर्थचक्र कोलमडून गेले होते. पुन्हा एकदा व्यवसायाची घडी बसत असताना कोरोनाच्या नवीन व्हायरस ची धास्ती वाढल्याने व्यावसायिकांत भीती आहे. धोका टाळण्यासाठी कोरोना नियमांचे पालन, मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com