विजेचा खेळखंडोबा! विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे होतेय नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

महावितरणचा कारभार सुधारण्यासाठी माकप पिंपरी चिंचवड शहर समितीच्यावतीने रस्त्यावर उतरण्याचा इशारा महावितरणच्या भोसरी विभागाला दिला. 

पिंपरी : गेल्या दोन महिन्यांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा सातत्याने खंडित होतोय. परिणामी ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांची अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तारांबळ उडत आहे. महावितरणचा कारभार सुधारण्यासाठी माकप पिंपरी चिंचवड शहर समितीच्यावतीने रस्त्यावर उतरण्याचा इशारा महावितरणच्या भोसरी विभागाला दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्रांतिकुमार कडुलकर व बाळासाहेब घस्ते म्हणाले, "आयटी आणि सेवा क्षेत्रातील "वर्क फ्रॉम होम' ड्युटीतील लाखो कर्मचाऱ्यांना वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागत आहे.'' 
गणेश दराडे व अपर्णा दराडे म्हणाल्या, "विजेच्या खेळ खंडोबामुळे शहरातील हजारो सोसायट्यांना पाणी मिळत नाहीये. उपसा वेळेवर न झाल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.'' 

सचिन देसाई व वीरभद्र स्वामी म्हणाले, "सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योगांचे आर्थिक नुकसान होत आहे. सामान्य जनता, मध्यम वर्ग, उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.'' 

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

सुकुमार पोन्न्पन व सतीश नायर म्हणाले, "विद्यापीठाची अंतिम परीक्षा 12 ऑक्‍टोबर पासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या काळात महावितरणची सेवा विस्कळित झाली, तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.'' 

अविनाश लाटकर व किसन शेवते म्हणाले, "गेल्या तीन वर्षात 18 टक्‍क्‍यांहून अधिक वीज दरवाढ लादणाऱ्या महावितरणने स्वतःच्या ग्राहक सेवेचा दर्जा का सुधारला नाही?'' 

कोंढव्यात दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून तरुणाचा खून 

विनोद चव्हाण व संतोष गायकवाड म्हणाले,"खंडित वीजपुरवठा सुरू करून ग्राहकांच्या अडचणी एका आठवड्यात सोडवा. अन्यथा कारभार सुधारण्यासाठी आंदोलन करावे लागेल.'' 

ख्वाजा जमखाने व संजय ओहोळ म्हणाले, "सध्या सगळा खेळ विजेवर अवलंबून आहे. परंतु खंडित पुरवठ्यामुळे सगळीकडेच अंधार झाला आहे.''

आजी तुझ्या हातचं जेवायचंय म्हणून केलेला तो फोन ठरला शेवटचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The loss of students online education due to power outages in PCMC