PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर;आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसासह मद्यधुंद वाहनचालक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

प्रेम प्रकरणातून महिला उपनिरीक्षकाशी झालेल्या वादातून पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसासह कर्मचाऱ्यासह मद्यप्राशन करून पोलिस व्हॅन चालवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 

पिंपरी - प्रेम प्रकरणातून महिला उपनिरीक्षकाशी झालेल्या वादातून पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसासह कर्मचाऱ्यासह मद्यप्राशन करून पोलिस व्हॅन चालवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 

करवाढ न करण्यावर शिक्कामोर्तब; महापालिका स्थायी समितीचा निर्णय

अनिल संपत निरवणे व संदीप तांबट अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. निरवणे दिघी पोलिस ठाण्यात तर तांबट हे  चिंचवड ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. निरवणे व महिला पोलिस उपनिरीक्षक यांचे मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, त्यांच्यात अंतर्गत वादविवाद झाले. त्यातून चिडून निरवणे यांनी उपनिरीक्षक महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देत 1 जानेवारीला रात्री दिघी पोलिस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ यावर निर्णय घेतला.  मंगळवारी निरवणे यांना निलंबन करण्यात आले. 

कुत्र्यांच्या हल्ल्यांवरून प्रशासनावर हल्लाबोल;स्थायी समिती सभेत चर्चा

तसेच तांबट यांनी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केले. मद्यप्राशन करून पोलिस व्हॅन चालविताना आढळल्याने त्यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले.

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love Matter with PSI Women Officer case Drunk driver suspended with police trying to commit suicide in pimpri