आरटीई मुलांमध्ये प्रवेशाबाबत भेदभाव;आरटीई पोर्टलवर बदल नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिलीसाठी वेगवेगळी वयोमर्यादा दिनांक ग्राह्य धरून प्रवेश दिले जात होते.

पिंपरी - सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नियमित शाळांमधील प्री केजी किंवा नर्सरीच्या प्रवेशासाठी मुलांच्या वयात बदल केलेला आहे. परंतु तो बदल आरटीईच्या विद्यार्थ्यांना लागू केला आहे. परिणामी शिक्षण विभागाकडून आरटीईच्या मुलांमध्ये भेदभाव करत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हक्काच्या शिक्षणापासून अनेक मुले वंचित राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिलीसाठी वेगवेगळी वयोमर्यादा दिनांक ग्राह्य धरून प्रवेश दिले जात होते. पूर्वप्राथमिक वर्गांसाठी प्रवेशासाठी निश्‍चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. याबाबी विचारात घेऊन एकवाक्‍यता आणण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त केली होती. मानिव दिनांक गृहीत धरून बालकाचे प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी तीन वर्षे पूर्ण असे आदेश दिला आहे. शाळा प्रवेशासाठी 30 सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आले. त्यानुसार बालकांच्या किमान वयात जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकारी मुख्याध्यापकांना दिले आहेत. ऑक्‍टोबर 2017 ते डिसेंबर 2017 मधील बालकांना नर्सरी किंवा एलकेजी या दोन्ही पैकी एका वर्गात पालकांच्या इच्छेनुसार प्रवेश घेता येऊ शकेल. अशा सूचना शाळांना देण्यात याव्यात, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) द. गो. जगताप यांनी शाळांना दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. 

झेरॉक्सचे पैसे दिले नाही म्हणून अ‍ॅड. असीम सरोदेंनी EDला पाठवली नोटीस!​

दरम्यान, यापूर्वी शाळा प्रवेशासाठी त्या शैक्षणिक वर्षातील 30 सप्टेंबर रोजीचे वय विचारात घेण्यात येत होते. परंतु 18 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार 2021 -22 या शैक्षणिक वर्षापासून शाळा प्रवेशासाठी 30 सप्टेंबरऐवजी 31 डिसेंबर मानिव दिनांक घोषित केला आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्री-केजी, ज्युनिअर केजीच्या प्रवेशाबाबत यावर्षी अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सरकारने नियमित शाळा प्रवेशासाठी वेगळी वयोमर्यादा आणि आरटीईच्या प्रवेशासाठी वेगळी वयोमर्यादा जाहीर केल्यामुळे अनेक विद्यार्थी एक, दोन महिन्यांच्या फरकाने आरटीई प्रवेशापासून वंचित राहू शकतात. 

आरटीई पोर्टलवर बदल नाही 
नियमित शाळा प्रवेशासाठी राज्य सरकारने वयात जो बदल केला आहे. तो बदल आरटीईच्या पोर्टलवर अद्ययावत करणे अपेक्षित आहे. परंतु अद्ययावत झाले नसल्याचे दिसून येत आहे. आरटीईच्या पोर्टलवर एक ऑक्‍टोबर 2017 ते 1 जानेवारी 2019 अशीच वयोमर्यादा ठेवली आहे. 

खुशखबर: ATM ला स्पर्श न करताही काढता येतील पैसे; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

असा केला बदल 
प्रवेशाचा वर्ग / किमान वय / वयाबाबत दिनांक वर्यामर्यादा 
- प्री केजी किंवा नर्सरी / 2/ 1 ऑक्‍टोबर 2017 ते 31 डिसेंबर 2018 
-एलकेजी किंवा ज्युनिअर केजी / 4/ 1 ऑक्‍टोबर 2016 ते 31 डिसेंबर 2017


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra education department rte admission CBSE ICSE School