
पिंपरी : हापूस आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, घरोघरी आमरस पुरीचे बेत होत आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात कर्नाटक, तमिळनाडू व केरळ या ठिकाणचा आंबा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे काही विक्रेते देवगड, रत्नागिरी हापूस आंबा म्हणून सर्रास विक्री करताना दिसत आहेत. त्यामुळे हापूसच्या नावाखाली बनावट आंब्याची खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे.