तळेगाव स्टेशन - हजारो वाहनांसह मराठा आंदोलकांचे वादळ गुरुवारी (ता. २८) मुंबईकडे रवाना होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुंबईकडे जाणा-या मराठा आंदोलकांच्या हजारो वाहनांच्या ताफ्यांनी चाकण-तळेगाव महामार्ग गुरुवारी (ता. २८) ओसंडून वाहीला. आंदोलकांच्या वाहनांवर लावलेल्या झेंड्यांमुळे तळेगाव-चाकण महामार्ग भगवामय झाला आहे.