Maratha Reservation : लोणावळ्याजवळ मराठ्यांच्या मुक्कामाची जय्यत तयारी; शंभर एकरांवर ‘छावणी’

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम बुधवारी (दि. २४) लोणावळा येथे होणार आहे.
Manoj jarange Patil
Manoj jarange PatilSakal

लोणावळा - मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम बुधवारी (दि. २४) लोणावळा येथे होणार आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत वाकसई येथील संत तुकाराम पादुका स्थानजवळील शंभर एकर जागेवर जरांगे पाटील यांचा मुक्काम आणि सभेसाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे-पाटील यांनी लाखो मराठा समाज बांधवांसह मुंबईकडे कूच केले आहे. २४ जानेवारीला जरांगे पाटील यांचा लोणावळ्यात सायंकाळी सहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

याठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जमा होण्याची शक्यता असून मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा बांधवासाठी सेवाभावी वृत्तीने काम करण्यात येत आहे. सभेच्या स्थळाची पंधरा जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई, स्वच्छता केली जाते आहे. जागेचे सपाटीकरणाचे करण्याचे काम सुरू आहे.

लवकरच काम पूर्ण होईल. मराठा समाजाचे स्वयंसेवक याठिकाणी जातीने हजर राहत तयारी करत आहेत.

अशी आहे वाहन पार्किंग व्यवस्था

सभेला होणारी गर्दी गृहीत धरून जवळपास शंभर एकर जागेवर आंदोलकांच्या मुक्कामाची तर शिलाटणे, कार्ला, वेहेरगाव, वाकसई या गावांमध्ये वाहनांच्या प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महामार्गालगत असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स चालकांनाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे.

या ठिकाणी होणार स्वागत

सांगवी फाटा येथे ११ वाजता आगमन

- रक्षक चौक, जगताप डेअरी, काळेवाडी चौक या ठिकाणी होणार स्वागत

- डांगे चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जरांगे पाटील अभिवादन करणार

- चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन

सायंकाळी ४ वाजता - निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प येथे अभिवादन व लोणावळ्याकडे मार्गस्थ

जरांगे पाटील यांचा दौरा

  • मनोज जरांगे-पाटील सकाळी ८ वाजता वाघोली येथून निघणार.

  • पुणे, पिंपरी-चिंचवड असे मार्गक्रमण करत दुपारी ते मावळात प्रवेश करतील.

  • आंदोलकांसाठी प्रत्येक घरातून पंचवीस भाकरी, शेंगदाणा चटणी आणि ठेचा असा बेत.

  • पाण्याचे ऐंशी टँकर तैनात करण्यात येणार.

  • फिरत्या शौचालयांचीही व्यवस्था केली जाणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com