मंगल कार्यालये, हॉटेल, मॉल चालकांनो नियम मोडणे पडेल साडेसात हजाराला

महापालिका प्रवक्ता पोरेडी यांची माहिती
marriage hall, hotel, mall operators
marriage hall, hotel, mall operators Team Esakal

पिंपरी : नियमभंग करणारे मंगल कार्यालये, हॉटेल, मॉल यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्यांदा आढळल्यास अडीच हजार रुपये, दुसऱ्यांदा आढळल्यास पाच हजार व तिसऱ्यांदा आढळल्यास साडेसात हजार रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रवक्ता शिरीष पोरेडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेच्या आठही प्रभाग स्थरावर पथके नियुक्त केली आहेत. त्यांच्या माध्यमातून मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचा अभाव, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. २७ फेब्रुवारीपासून शुक्रवारपर्यंत (ता. १६) दोन हजार २४९ व्यक्तींवर कारवाई केली असून ३४ लाख ८१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यात नियमभंग करणारे ७९४ मंगल कार्यालये, मॉल, हॉटेल चालकांकडून सात लाख ३१ हजार ५०० रुपये आणि मास्क न वापरणाऱ्या एक हजार ४५५ व्यक्तींकडून २७ लाख ४९ हजार ५०० रुपये दंडाच्या रकमेचा समावेश आहे.

आयसीयू फुल्ल!

महापालिकेच्या दहा कोविड केअर सेंटरची बेड क्षमता दोन हजार १८ आहे. त्यापैकी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ १८६ बेड शिल्लक होते. म्हणजेच कोविड केअर सेंटरमध्ये एक हजार ७३२ रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका रुग्णालयांतील आयसीयूत एकही बेड उपलब्ध नाही.

होमआयसोलेट २० हजार

शहरात सुमारे २० हजार रुग्ण होमआयसोलेट आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी महापालिकेने कॉलसेंटर सुरू केले आहेत. या माध्यमातून रुग्ण व नातेवाइकांचा डॉक्टरांशी संवाद साधून दिला जाणार आहे. रुग्णांना वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे, असे पोरेडी यांनी सांगितले.

२१६ व्हेंटिलेटर वाढविले

रुग्णसंख्या विचारात घेता महापालिकेने व्हेंटिलेटरची संख्या वाढवली आहे. पूर्वी ७४ व्हेंटिलेटर महापालिका रुग्णालयात होते. त्यात आता २१६ वाढविण्यात आले असून, एकूण संख्या २९० झाली आहे.

कंपन्यांकडून ९० व्हेंटिलेटर

हिंदुस्थान पेट्रोलियम- ४, इंडोस्पेस डेव्हलपमेंट मॅनेजमेंट- ५, क्रेडाई पुणे मेट्रो- १०, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज- ४, बजाज ऑटो- १२, टाटा मोटर्स- ५, ॲटलास कॉपको- ५० असे ९० व्हेंटिलेटर कंपन्यांच्या सीएसआर फंडातूनही महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. यातील सहा व्हेंटिलेटर मिळाले असून, पुढील आठ दिवसांत ८४ व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com