Maval Loksabha Election Result : उरण : विद्यमान असूनही बारणेंना फटका

मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना, भाजप या महायुतीच्या उमेदवाराने ९६,६१५ मतांनी विजय संपादन केला आहे.
Maval loksabha Election Result
Maval loksabha Election Resultesakal
Updated on

मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना, भाजप या महायुतीच्या उमेदवाराने ९६,६१५ मतांनी विजय संपादन केला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना हार पत्करावी लागली.

उरण विधान मतदारसंघाचा विचार केला तर; श्रीरंग आप्पा बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यावर २०१९ च्या निवडणुकीत उरण मतदारसंघात २,८८८ मतांची आघाडी मिळविली होती. बारणे यांना ८९,५८७ मते मिळाली होती, तर पार्थ पवार यांना ८६,६९९ मते मिळाली होती. त्या तुलनेत यावेळी वाघेरे यांना या मतदारसंघात १३ हजार २५० मतांचे मताधिक्य घेतले.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे २०१९ च्या निवडणुकीत एकत्रित शिवसेना आणि भाजप युतीमधून लढले होते. त्यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेकाप आघाडीचे उमेदवार हे पार्थ पवार होते. मात्र, राजकारणात बदल घडल्याने शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेगळे झाले आणि राजकारणाला नवी कलाटणी मिळाली.

यावेळी २०२४ च्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेचे उमेदवार हे आमने-सामने लढले. महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली. महायुतीमध्ये या उरण मतदारसंघात भाजपला पाठिंबा दिलेले महेश बालदी आमदार असल्याने त्यांनी मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी बारणे यांचे काम मोठ्या प्रमाणात केले.

तसे पाहिले तर; या मतदारसंघात शिवसेनेची ताकद नसताना बारणे यांना ९१,२८५ मते ही भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महायुतीमधील घटक पक्षांमुळे मिळाली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शेकाप अशी महाविकास आघाडी असतानाही संजोग वाघेरे यांना १,०४,५३५ मते मिळाली.

वाघेरे यांनी उरण मतदारसंघात १३,२५० मतांची आघाडी घेतली आहे. वाघेरे यांना उरण मतदारसंघात मोठी आघाडी मिळेल, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे गणित बांधले होते. मात्र, ते गणित फेल गेले. वाघेरे यांना केवळ १३,२५० मतांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. कर्जत आणि उरण या मतदारसंघात मूळचा शिवसेनेचा प्रभाव पहिल्यापासून होता.

त्यानंतर या वेळी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना सहानुभूती होती. त्याचा फायदा वाघेरे यांना झाला. तसेच संयमी आणि शांत स्वभावाच्या वाघेरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही प्रभाव या भागात पडल्याचे निकालानंतर दिसून आले. तसेच गेल्या दहा वर्षांत धनुष्यबाण हे चिन्ह सर्वश्रृत आहे. त्याचा प्रचार करणे सोयीचे गेले.

मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले मशाल चिन्ह गावोगावी पोचविण्यात काही प्रमाणात वाघेरे अपयशी ठरले. विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, महाविकास आघाडी मोठी बनली आहे. अशीच जर आघाडी टिकली तर येणाऱ्या विधानसभा निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.

मशाल चिन्ह पोचविण्यात अपयश

बारणे हे दोन वेळा या मतदारसंघात खासदार झाले. त्यामुळे त्यांचा या भागात पदाधिकाऱ्यांशी संपर्क होता. मात्र, संजोग वाघेरे नवीन उमेदवार होते. त्याचाही फटका त्यांना या मतदारसंघात बसला. बारणे यांच्याकडे असणारे धनुष्यबाण हे चिन्ह जुनेच शिवसेनेचे असल्याने व अनेकांना मशाल माहीत नसल्याने किंवा मशाल चिन्हाचा प्रचार कमी झाला असल्यानेसुद्धा वाघेरे यांना मतदान कमी झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com