मावळातील 'या' भागांना हवे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कवच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

गावखेडी सीसीटीव्हीच्या सुरक्षेखाली आणण्यासाठी काही ग्रामपंचायतींनी पावले टाकली आहे, पण त्यांना काही मर्यादा येत आहेत.

कामशेत (ता. मावळ) : 'आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत आहात', असे वाक्य शासकीय कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, हॉस्पिटल, शाळा महाविद्यालय, शॉपींग मॉल थिएटर, दुकाने येथे हमखास वाचायला मिळते. हेच सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच खेडोपाडी पोहोचले आहे. पवनानगरची बाजारपेठ सीसीटीव्हीच्या निगराणी खाली आली आहे. सीसीटीव्हीचे हे सुरक्षा कवच ग्रामीण भागात पोहोचावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

खेडोपाडी घडलेल्या गुन्ह्याचा छडा लावायला पोलिसांना सीसीटीव्हीची मदत होईल आणि या सगळ्या परिसरात सीसीटीव्हीचा वॉच असल्याचा धाक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर राहिल. गावखेडी सीसीटीव्हीच्या सुरक्षेखाली आणण्यासाठी काही ग्रामपंचायतींनी पावले टाकली आहे, पण त्यांना काही मर्यादा येत आहेत. सध्या सुरू असलेले सीसीटीव्ही कॅमेरे निसर्ग चक्रीवादळाच्या हेलखाव्यात नादुरुस्त झाले आहे. तर काही ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या मदतीने सीसीटीव्ही सुरू आहे. पण काही ठिकाणी अद्याप सीसीटीव्हीची सुरक्षितता पोहोचली नाही. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक ठिकाणी घडलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार पोलिसांना धागेदोरे सापडले आहेत. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिरोता धरण, वाडिवळे धरण, सोमवडी धरण, कोंडेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, राजमाची किल्ला, अमीना मशीद पवना चौक, जामा मशीद बाजारपेठ, कडधे मशीद यांच्याकडे संवेदनशील ठिकाणे म्हणून पाहिले जाते, तर आंदर मावळ, नाणे मावळ आणि पवन मावळातील अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यांनाही संरक्षित करण्याची गरज आहे. याशिवाय हजारो धनिकांनी कित्येक हेक्टर जमिनी घेतल्या आहेत. तर कित्येक सेलिब्रिटींचे फार्महाऊसही आंद्रा, ठोकळवाडी, वाडिवळे, सोमवडी, पवना, जाधववाडी धरण परिसरात आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही महिन्यांपूर्वी कोंडिवडे जवळच्या एका फार्महाऊसवर एकाने गोळीबार केला होता. तर या आठवड्यात नागाथली येथे फार्महाऊसच्या व्यवस्थापकावर गोळीबार झाला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलिस कार्यरत आहेत. कधीकधी गुन्हेगार पोलिसांना हुलकावणी देऊन पसार होतात, तर कधी गुन्हेगाराचा शोध लगेच लागतो. ग्रामीण भागातील वाढते नागरिकीकरण पाहता, शहरांना जोडणारे खेड्यातील मुख्य रस्ते, पर्यटनस्थळे, फार्महाऊस सीसीटीव्हीने संरक्षित व्हावेत, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maval rural areas need cctv security cover