Video : घरगुती गणपती सजावटीतून दिला कोरोना रोखण्याचा संदेश

रमेश मोरे
Saturday, 29 August 2020

कोरोना महामारीच्या संकटामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक सण,उत्सव नियम अटी व सुरक्षिततेचे पालन करून साजरे करावे लागत आहेत. महाराष्ट्राचा असाच लोकप्रिय सण म्हणजे गणेश उत्सव. उत्साह व मांगल्याचा सण म्हणून दहा दिवस विविध आरास, हलते देखावे करून साजरा करण्यात येतो.

जुनी सांगवी - कोरोना महामारीच्या संकटामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक सण,उत्सव नियम अटी व सुरक्षिततेचे पालन करून साजरे करावे लागत आहेत. महाराष्ट्राचा असाच लोकप्रिय सण म्हणजे गणेश उत्सव. उत्साह व मांगल्याचा सण म्हणून दहा दिवस विविध आरास, हलते देखावे करून साजरा करण्यात येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र यावर्षी महामारीच्या संकटाला सामोरे जात असताना यावर मर्यादा आल्या असे असतानाही घराघरातून गणपती उत्सव साजरा होताना पहावयास मिळतो.

कोरोनाच्या पिंजऱ्यात अडकले तमाशा कलावंत

जुनी सांगवी येथील शिंदेनगर या भागात येथील कैलास भागवत व त्यांचे चिरंजिव विकास भागवत व कुटूंबियांनी यावर्षी कोरोना संकटामुळे मानवी जिवन कसे विस्कळित झाले. सर्वसामान्यांसह समाजातील आर्थिक घडी कशी बिकट झाली.लॉकडाऊन काळातील निर्मनुष्य रस्ते, धावणारी शहरे कशी ठप्प झाली. रूग्णालयांमधून डॉक्टर व आरोग्य प्रशासनातील सर्वांचे काम, पोलिस व ईतर संबंधित प्रशासनातील सर्व घटकांचे काम व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनलॉकमधे कशी खबरदारी घ्यावी याबाबत देखाव्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

बिल्डर आणि ग्राहकांमधील वाद मिटवण्यासाठी 'महारेरा'चा पुढाकार; 'अशी' केली जात आहे मदत!

देशात कोरोना शिरकाव झाल्यापासून ते लॉकडाऊन काळ अनलॉकमधील प्रत्येक प्रसंग त्याचे फायदे तोटे या देखाव्यातून दाखवले आहेत. लॉकडाऊनमधे धावणारे जग थांबल्यामुळे प्रदुषण कसे कमी झाले. यातून माणसाने काय शिकवण घेतली पाहिजे. भरलेले दवाखाने, निर्मनुष्य रस्ते, भाजी व ईतर खरेदीसाठी गर्दी करून बेजबाबदारीने वागणारी माणसं, तर एकीकडे अहोरात्र झटणारी यंत्रणा, स्मशानभुमीतील योगदान देणारी माणसे, दुरावलेले जनजिवन यापासुन माणसाने माणुसपणाची शिकवण घेत निसर्गाची काळजी घ्यायला हवी असे विविध पैलू या देखाव्यातून साकारलेले आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: message of preventing corona given from home Ganpati decoration