esakal | Video : अन् 'भारत सरकार झिंदाबाद'च्या घोषणा सुरू झाल्या... 

बोलून बातमी शोधा

Video : अन् 'भारत सरकार झिंदाबाद'च्या घोषणा सुरू झाल्या... 

- पिंपरीतून 1 हजार 116 परप्रांतीय उत्तराखंडकडे रवाना

Video : अन् 'भारत सरकार झिंदाबाद'च्या घोषणा सुरू झाल्या... 
sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी : गेल्या कित्येक दिवसांपासून मूळगावी जाण्यासाठी आसुसलेले येथील तब्बल एक हजार 116 परप्रांतीय कामगार विशेष श्रमिक रेल्वेने उत्तराखंडकडे रवाना झाले. सोमवारी (ता. 11) पुण्याहून दुपारी एक वाजता रवाना झालेल्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक परप्रांतीय हे पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम मजूर होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काळेवाडी, थेरगाव, डांगे चौक, थरमॅक्‍स चौक या भागात राहणाऱ्या या मजुरांचे हातावरचे पोट होते. घरभाडेदेखील या मजुरांचे थकलेले होते. हाताला कामधंदा नसल्याने दोन वेळा खाण्याची पंचाईत झाली होती. सर्व मजुरांची वैद्यकीय तपासण्या केल्यानंतरच सर्वांना परवानग्या देण्यात आल्या. मेडिकल प्रमाणपत्र व पोलिस परवानगी मिळाल्यानंतरच या सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने परवानगी देण्यात आली. यातील कोणत्याही मजुरांकडून रेल्वे प्रशासनाने तिकीट आकारले नाही. 

चिंताजनक : मावळात कोरोनाचा आणखी रुग्ण; आता संख्या झाली...

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून आसन क्रमांक देण्यात आले. यासाठी स्वतंत्र मदतकक्ष स्थापन करण्यात आल्याचे पश्‍चिम रेल्वे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले. उत्तराखंडच्या कामगारांना सोडण्यासाठी पीएमपीच्या वतीने पिंपरीहून पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत 63 बस सोडण्यात आल्या. दरम्यान एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी दोन बस राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने या सर्वांना जेवण पॅकेट व सॅनिटायझर पुरविण्यात आले. सर्व कामगारांनी 'भारत सरकार झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.