धक्कादायक : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चुकला कोरोना मृत्यूंचा आकडा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची गणना चुकल्याचे महापालिका प्रशासनानेच आज (रविवारी) कबूल केले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची गणना चुकल्याचे महापालिका प्रशासनानेच आज (रविवारी) कबूल केले. काल शनिवारपर्यंत मृतांची एकूण संख्या 862 कळविली होती. परंतु, 22 मृतांची गणना एकूण बेरजेत दोन वेळा धरली होती. त्यामुळे ही दुबार 22 नावे वगळून रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत एकूण मृतांची संख्या 854 निश्चित करण्यात आली, असे महापालिका अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज 1077 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48 हजार 737 झाली आहे. आज 601 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 33 हजार 873 झाली आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत सहा हजार 958 जण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील 14 व शहराबाहेरील तीन, अशा 17 जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या 854 झाली आहे. कालचा 862 मृतांचा आकडा ग्राह्य धरल्यास व त्यात आजचे 14 मृत्यू मिळविल्यास एकूण मृतांची संख्या 876 होते. 

कौतुकास्पद : भटक्‍या कुत्र्यांसाठी 'ते' ठरतायेत अन्नदाते 

भोसरीतील चौघांचा मृत्यू

आज मयत झालेल्या व्यक्ती भोसरी (पुरूष वय ६५), भोसरी (पुरूष वय ६५), भोसरी (पुरूष वय ७६), भोसरी (पुरूष वय ७९), सांगवी (पुरूष वय ७६), नेहरूनगर (पुरूष वय ४३), पिंपरी (पुरूष वय ३९), पिंपरी (पुरूष वय २९), वाकड (पुरूष वय ७६), मोशी (पुरूष वय ६४), मोशी (पुरूष वय ७४), आंबेगाव (पुरूष वय ६५), आंबेगाव (पुरूष वय ६५), खेड (पुरूष वय ६५), देहूरोड (स्त्री वय ६८), बिजलीनगर (स्त्री वय ४६), आळंदी रोड (स्त्री वय ६२) येथील रहिवासी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: miss corona death number by pimpri chinchwad municipal corporation