दुचाकीचे हप्ते फेडायचे होते, पण तरुणाने हा मार्ग निवडला अन् शेवटी...

दुचाकीचे हप्ते फेडायचे होते, पण तरुणाने हा मार्ग निवडला अन् शेवटी...

पिंपरी : लॉकडाउनमध्ये दुचाकीचे हप्ते फेडणे शक्य न झाल्याने एकाने हप्ते फेडण्यासाठी अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने पादचाऱ्याचा मोबाईल चोरला. हा चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

गुड्डू सलीम पठाण ( वय 22, रा. चक्रपाणी वसाहत, गणराज कॉलनी, भोसरी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बजरंगलाल भंग (वय 30, रा. स्वामी समर्थ कॉलनी, राहाटणी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे 10 जूनला राहाटणीतील शुभम डेअरीजवळील रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेले दोन आरोपी फिर्यादीच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार झाले. वाकड पोलिस तपास करीत असताना आरोपी पठाण याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला ताब्यात घेत सखोल तपास करून त्याने चोरलेला आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आरोपी पठाण याने हप्त्यावर दुचाकी घेतली होती. मात्र, लॉकडाउनमध्ये दुचाकीचे हप्ते फेडणे शक्य न झाल्याने त्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने मोबाईल चोरल्याचे समोर आले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com