
"सर्वांना पेन्शन मिळालीच पाहिजे,' अशा घोषणा देत मासिक पेन्शनच्या मागणीसाठी अंगणवाडीताईंनी सोमवारी (ता. 11) धरणे आंदोलन केले. या आंदोलनात बदायूं अत्याचार घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
पिंपरी- ""पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अंगणवाडीताईला सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे', "सर्वांना पेन्शन मिळालीच पाहिजे,' अशा घोषणा देत मासिक पेन्शनच्या मागणीसाठी अंगणवाडीताईंनी सोमवारी (ता. 11) धरणे आंदोलन केले. या आंदोलनात बदायूं अत्याचार घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
पिंपरीगावातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या फलक हातात घेऊन अंगणवाडीताईंनी धरणे धरले. ऍड. मोनाली चंद्रशेखर अपर्णा व कल्याणी दुर्गा रवींद्र यांच्या डफलीच्या ठेक्यावर सेविका मंदा मोरे यांनी ध्येय गीतातून अंगणवाडीताईंच्या समस्या कथन केल्या. अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र संलग्न व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष नितीन पवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
पवार म्हणाले, ""क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रामुख्याने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच उत्तर प्रदेश येथे ज्येष्ठ अंगणवाडीताईवर मंदिरातील पुजारी व साथीदारांनी अत्याचार करून निर्घृण खून केला. तेथील अत्याचारी नराधमांना कठोर शासन करावे.''
सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह
पिंपरी चिंचवड अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा शैलजा चौधरी म्हणाल्या, ""गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवृत्त झालेल्या किंवा मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत सेवा समाप्ती लाभ त्वरित अदा करण्यात यावा.''
मालती किरदत्त म्हणाल्या, ""एकरकमी सेवा समाप्ती लाभ कायम ठेवून त्या व्यतिरिक्त सेविका मदतनिसांना त्यांच्या शेवटच्या मानधनाच्या निम्मी रक्कम मासिक पेन्शन स्वरूपात तहहयात देण्यात यावी.''
पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात
उर्वशी गाढवे म्हणाल्या, ""भविष्यात कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाल्यास पेन्शनमध्ये त्या वाढीच्या निम्म्या रकमेची वाढ करण्यात यावी.''
शमा सय्यद म्हणाल्या, ""प्रकल्पाच्या पाया झालेल्या मात्र सरकारी आदेशात कालावधी निश्चित केल्याने निवृत्तीनंतरचे लाभ न मिळालेल्या अंगणवाडी ताईंनाही निवृत्तीनंतरचे लाभ दिला पाहिजे.''
सुशीला सराटे म्हणाल्या, ""ज्येष्ठ अंगणवाडीताईंवर अत्याचार केलेल्या नराधमांना शासन केले पाहिजे.''
'कोरेगाव भीमा'च्या आरोपपत्रातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं; रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप