esakal | जम्बो हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळणार 'हे' चार डॉक्‍टर!
sakal

बोलून बातमी शोधा

Covid_Jumbo_Pimpri

पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वखर्चातून ऑटो क्‍लस्टर येथे 200 बेडचे रुग्णालय उभारले आहे.

जम्बो हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळणार 'हे' चार डॉक्‍टर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अण्णासाहेब मगर स्टेडियम आणि ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे उभारलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयांसाठी महापालिकेने चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. रुग्णांच्या तक्रारी सोडविण्याबरोबरच रुग्णालयीन व्यवस्थेचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. 

पुणे शहरातील मराठा नेत्यांना पोलिसांनी बजावली नोटीस; गुप्तचर विभागाने दिले आदेश​

जिल्हा प्रशासन, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे आठशे बेडचे जम्बो फॅसिलिटी रुग्णालय उभारले आहे. खासगी कंपनीतर्फे तिथे सेवा पुरविण्यात येत आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वखर्चातून ऑटो क्‍लस्टर येथे 200 बेडचे रुग्णालय उभारले आहे. दोन्ही रुग्णालयांच्या कामकाजावर नियंत्रणाची आणि समन्वयाची जबाबदारी महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे आहे. या रुग्णालयांतील कामकाजाचे नियोजन करण्यासाठी पाटील यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) चार डॉक्‍टरांची नियुक्ती केली आहे. 

भारताच्या 'शुक्रयान'कडे वळल्या जगाच्या नजरा; शुक्रावर जाणारी जगातील एकमेव मोहीम!​

हे आहेत डॉक्‍टर 
ऑटो क्‍लस्टर रुग्णालयासाठी नेत्र तज्ज्ञ डॉ. राहुल गायकवाड (नोडल अधिकारी) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश लोंढे यांची, तर मगर स्टेडियम रुग्णालयासाठी कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. सुनील पवार (नोडल अधिकारी) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. 

डॉक्‍टरांचे कामकाज 
प्रयोगशाळेचे अहवाल पडताळणी करणे, कर्मचाऱ्यांची कर्तव्य आणि कामकाजाचे नियोजन करणे, वैद्यकीय उपकरणासंबंधी निराकरण करणे, कोरोनासंबंधी अहवालावर स्वाक्षरी करणे, डॉक्‍टर आणि रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण करणे, वैद्यकीय कामकाजासाठी नियुक्‍त्या करणे आदी कामांची जबाबदारी संबंधित डॉक्‍टरांवर असल्याचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image