
MSRTC App
Sakal
अविनाश ढगे
पिंपरी : ‘एसटी महामंडळा’च्या ‘आपली एसटी’ या ॲपचे लोकार्पण राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले; पण फक्त तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच बस क्रमांक किंवा सेवा क्रमांक टाकून बसचे ‘लोकेशन’ पाहता येत आहे. एसटीच्या एकूणपैकी सरासरी दीड ते दोन टक्के प्रवासीच तिकीट आरक्षित करून प्रवास करतात. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करून त्या प्रवाशांसाठीच हे ॲप विकसित केले का? असा प्रश्न विचारला जात आहे.