esakal | पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी साधला रुग्णांशी संवाद

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil
पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी साधला रुग्णांशी संवाद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘बरं वाटतंय का?’, ‘जेवण मिळतंय ना?’, ‘औषधे नियमित मिळताहेत?’ अशी विचारणा करीत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी रुग्णांशी संवाद साधला. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम जम्बो रुग्णालयास त्यांनी भेट दिली.

जम्बो रुग्णालयाबाबतीत रुग्ण व नातेवाइकांसह काही लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त पाटील यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी जम्बो रुग्णालयासह ऑटो क्‍लस्टर, बालनगरी, वायसीएम व इतर रुग्णालयांना भेट देऊन आढावा घेतला. रुग्णांशी संवाद साधला, औषधोपचार, जेवणाचा दर्जा याबाबत माहिती घेतली. डॉक्टरांशी संवाद साधला. साफसफाईबाबत विचारपूस केली. रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. महापालिकेमार्फत रुग्णांची चांगल्या प्रकारची सोय आहे. औषधोपचार सुरू आहेत, असे सांगितले.

हेही वाचा: रेमडेसिव्हीर इंजेक्शनची समस्या तीन दिवसांत संपेल

ऑक्सिजन पुरवठा

दरम्यान, ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत. तरीही ऑक्सिजनचा आवश्यक पुरवठा सुरू आहे. त्यासाठी समन्वयक म्हणून उपायुक्त स्मिता झगडे (संपर्क ७८८७८९३०७७) काम पाहत आहेत. जिल्हास्तरावरून नियुक्त समितीही ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नियोजन करीत आहे. या समितीत सहआयुक्त एस. बी. पाटील (९३२६०३५७६७), सहायक आयुक्त पी. एम. पाटील (९८६७४२५८५७) आदींचा समावेश आहे.

लसीकरण साठा

३,४९,५०० - प्राप्त

३,४३,५०० - वाटप

६,००० - शिल्लक