साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे पिंपरी महापालिकेचे मंडळांना आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

कोविडमुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले. मं

पिंपरी : कोविडमुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले. मंडळांना आवश्‍यक असणारे परवाने महापालिकेच्या आठही क्षेत्रिय कार्यालयांमार्फत उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी संगितले. 

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला

येत्या 22 ऑगस्टपासून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात व ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती. त्यात अतिरिक्त आयुक्त पवार बोलत होते. अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, भूमी आणि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, काळेवाडीतील आदर्श मित्र मंडळ, काळभोरनगरमधील श्रीकृष्ण गणेश तरुण मंडळ आणि जुनी सांगवीतील मधुबन सोसायटी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासह अन्य मंडळाचे पदाधिकारी ऑनलाइन पद्धतीने चर्चेत सहभागी झाले. 

यंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय

अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे म्हणाले, ""राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार योग्य दक्षता घेऊन सार्वजनिक मंडळांनी उत्सव साजरा करावा.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation appeals to Mandals to celebrate Ganeshotsav in a simple manner