
कोरोना व लॉकडाउनमुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शाळा बंद होत्या. मात्र, संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सर्व अनलॉक झाले. टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
पिंपरी - सकाळच्या कोवळ्या उन्हात तब्बल दहा महिन्यांनी शाळांचे प्रांगण गुरुवारी (ता. 4) गजबजले. घंटा घणघणली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थनांचे शब्द परिसरात घुमले. "भारत माझा देश आहे...' या प्रतिज्ञेचे शब्द कानी पडले. राष्ट्रगीतानंतर "भारत माता कीऽऽ जयऽऽऽ'चा नारा दिला. आणि मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प घेऊन चिमुकली पावले आपापल्या वर्गाकडे वळली, कारण पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा सुरू झाली.
असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास
कोरोना व लॉकडाउनमुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शाळा बंद होत्या. मात्र, संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सर्व अनलॉक झाले. टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या आदेशानुसार शहरातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग गेल्या महिन्यापासून सुरू झाले. आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झाले. त्यापूर्वी शाळांची साफसफाई करण्यात आली. निर्जंतुकीकरण केले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पालकांचे संमतिपत्र व प्रत्येक विद्यार्थ्याकडे मास्क आवश्यक होते. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मास्क देण्यात आले. काही शाळांनी मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रार्थनेच्या वेळी दोन ओळींमध्ये सहा फुटांचे व दोन विद्यार्थ्यांमध्ये अंतर होते. शाळांच्या प्रवेशद्वारावरच थर्मलगणद्वारे विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान तपासण्यात आले. सॅनिटायझरने हात निर्जंतुक करून प्रवेश देण्यात आला. वर्गातील एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात आला. महापालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सांगवीतील अहल्यादेवी होळकर शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महापालिकेच्या सकाळ सत्रातील शाळांची वेळी आठ ते अकरा व दुपार सत्रातील शाळांची वेळ एक ते चार होती.
परीक्षेसाठी कोर्टानं मंजूर केला जामीन; कोंबड्या चोरल्याच्या गैरसमजातून केला होता जीवघेणा हल्ला
केवळ 21.5 टक्के उपस्थिती
एकूण संख्या - 424
एकूण विद्यार्थी - 1,19,210
आज उपस्थित - 25,745
कोरोना टेस्ट शिक्षक - 5392
टेस्ट न झालेले - 397
(महापालिका व खासगी शाळा)