उसने पैसे देणं आलं जीवाशी; कामशेतला दोघांनी मिळून रचला हत्येचा कट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

  • बुधवारी सायंकाळी मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला.

कामशेत (ता. मावळ) : मित्राचे उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून युवकाचा अज्ञातस्थळी नेऊन वस्तरा व चाकूने वार केला, तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना येथे घडली. समीर बाबू शेख (वय 17, रा. पंचशील कॉलनी, कामशेत) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. 

खोपोलीजवळ कारला अपघात; चालकाचा मृत्यू

बुधवारी (ता. 18) सायंकाळी सातच्या सुमारास मृत समीर शेख याने साहिल सादिक शेख (वय 20, रा. सहारा कॉलनी, कामशेत) यास पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून घरी जाऊन शिवीगाळ केली. याच कारणावरून चिडून आरोपी साहिल व अल्ताफ लतिफ सय्यद (वय 20, रा. दत्त कॉलनी, कामशेत) यांनी समीरला मोटारसायकलवर कामशेतच्या हद्दीतील छत्री पॉइंट जवळील मुस्लिम दफनभूमीच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याला नेले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तेथे त्याच्यावर वस्तारा व चाकूने वार केले, तसेच डोक्यात दगड मारून ठार केले. बुधवारी सायंकाळी मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला. पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या काही तासांत या खुनाच्या गुन्ह्यातील साहिल व अल्ताफ यांना अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of seventeen year old youth at kamshet