देहू : मामुर्डीत तरुणाचा खून, पत्नीवर संशय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

देहूरोड येथील मामुर्डीतील भैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या एका घरात युवकाचा मृतदेह मंगळवारी (ता. 29) पहाटे आढळून आला.

देहू : देहूरोड येथील मामुर्डीतील भैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या एका घरात युवकाचा मृतदेह मंगळवारी (ता. 29) पहाटे आढळून आला. युवकाच्या डोक्‍यात वार करून खून करण्यात आला आहे. देहूरोड पोलिसांनी युवकाच्या पत्नीला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मयूर गोविंद गायकवाड (वय 28, रा. मामुर्डी) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी रितू हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत मयूर आणि रितू यांचा दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना मुलबाळ नव्हते. त्यांची सतत भांडणे होत होती. सोमवारी (ता. 28) दुपारी रितू घरातून निघून गेली होती.

कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी

मयुरची आई आणि भाऊ दोघेही घरी नव्हते. त्याच दिवशी सोमवारी रात्री रितू घरी आली. मयूर आणि रितू दोघे जण घरात झोपले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मयूर याच्या डोक्‍यात वार करून खून करण्यात आला. घरात दोघेच असल्याने पोलिसांनी संशयित म्हणून रितूला ताब्यात घेतले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of a young man in mamurdi dehuroad

Tags
टॉपिकस
Topic Tags: