पिंपरीत तरुणाचा निघृण खून; कारण ऐकाल तर बसेल धक्का!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

शनिवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास शंकर पवार हा हनुमान मंदिरासमोर असताना आरोपी त्याठिकाणी आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी शंकर याच्यावर धारदार हत्याराने वार केले.

पिंपरी : विरोधी गटातील तरुणाच्या फोटोचा व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना पिंपरी येथे उघडकीस आली. यातील आरोपी फरारी आहेत. 

बारामतीतील अधिकारी माध्यमांना माहिती देण्यास करताहेत टाळाटाळ

शंकर गोविंद सुतार (वय 23, रा. हनुमान मंदिरासमोर, विद्यासागर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष चौगुले (वय 25 ), अजय कांबळे (वय 23), मोसीन शेख (वय 25), पप्पू पवार (वय 28 ) या आरोपींवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मृताची आई नीला पवार यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास शंकर पवार हा हनुमान मंदिरासमोर असताना आरोपी त्याठिकाणी आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून  आरोपींनी शंकर याच्यावर धारदार हत्याराने वार केले. तसेच दगडी पाटा डोक्यात घातला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शंकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी अकराच्या सुमारास शंकरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
  
विरोधी गटातील तरुणाच्या फोटोचा व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी आरोपींचे काही जणांसोबत भांडण झाले होते. या भांडणावरून आरोपींची पुन्हा मृताच्या भावसह इतरही तरुणांशी बाचाबाची झाली होती. यातून ही घटना घडली. 
याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a young man in Pimpri for keeping WhatsApp status

टॉपिकस
Topic Tags: