चिंचवडमध्ये दोन गटात हाणामारी; कोयते, तलवारीने प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

चिंचवड येथील विद्यानगर येथे दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये कोयते, तलवारीने एकमेकांवर हल्ला केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

पिंपरी - चिंचवड येथील विद्यानगर येथे दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये कोयते, तलवारीने एकमेकांवर हल्ला केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. 

याप्रकरणी विक्रम भंवरसिंग राजपूत (वय 22, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिफाना स्पेशल काळे, करण स्पेशल काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, किरण स्पेशल काळे व गब्बर पवार (सर्व रा. विद्यानगर, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.31) रात्री अकराच्या सुमारास आरोपी तिफाना काळे ही फिर्यादी विक्रम यांच्या घरासमोर आली. "तुम्ही आमच्या घरावर दगड का मारले' असा प्रश्न केला. त्यावर विक्रम यांनी आम्ही दगड मारले नसल्याचे सांगितले. त्यावर आरोपी तिफाना यांनी तू घराबाहेर ये बघतेच तुला असा दम भरला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी विक्रम आरोपीच्या पाठीमागून त्यांच्या घराजवळील खदाणीजवळ गेले त्यावेळी आरोपीची दोन मुले व आणखी एकजण हातात लोखंडी कोयता घेऊन उभे होते. फिर्यादी याठिकाणी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत कोयत्याने त्याच्यावर वार केले. मात्र, फिर्यादी यांनी ते चुकवले, फिर्यादी यांचा बचाव करण्यासाठी तिथे आलेला त्यांचा भाऊ व भावाचा मित्र यांना देखील आरोपीने कोयत्याने मारहाण केली. या हाणामारीत फिर्यादी तसेच त्यांच्या भावावर कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. 

शाळा बंद, मग टेबल-खुर्च्या कोणासाठी; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

तसेच याप्रकरणी तिफाना स्पेशल काळे (वय 48, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनीही पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम भंवरसिंग रजपूत, अंकुर आजेशाने पवार, रोहित कुरमे, अक्षय काळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आकाश भंवरसिंग रजपूत याला अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या 487 पोलिसांना नववर्षानिमित्त मिळाली अनोखी भेट

फिर्यादी तिफाना यांच्या घरावर गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास दगड पडू लागल्याने त्या व त्यांचे पती स्पेशल काळे हे बाहेर येऊन शिवीगाळ करायला लागले. यावेळी त्यांनी चार आरोपींना तिथून पळून जाताना पाहिले. आरोपी विक्रम व आकाश हातात तलवार आणि कोयता घेऊन फिर्यादीच्या पतीच्या अंगावर धावून गेले. आरोपी विक्रमने हातातील कोयता तिफाना यांच्या डोक्‍यात मारला. त्यानंतर फिर्यादी यांची मुले या भांडणाचा आवाज ऐकून बाहेर आले. आरोपींना यांच्यावर देखील वार करत त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murderer attack in two groups in chinchwad crime