esakal | माझे घर, माझी जबाबदारीच्या स्वयंसेवक मानधनाशिवाय
sakal

बोलून बातमी शोधा

My house My responsibility volunteers did not get honorarium in Diwali

कोरोना प्रादूर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यात शहराचे सर्व्हेक्षण करण्यात आले. नाममात्र मानधन का होईना देण्याचे महापालिका व राज्य शासनाने याआधीच जाहीर केले होते.

माझे घर, माझी जबाबदारीच्या स्वयंसेवक मानधनाशिवाय

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : कोरोना काळात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या राज्य शासनाच्या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात अनेक स्वयंसेवकांनी जिवावर उदार होऊन आरोग्य सेवेचे काम केले. प्रत्येक दिवशी 50 घरांचे सर्व्हेक्षण केले. मात्र, ऐन दिवाळी सणात अद्याप स्वयंसेवकांना मानधन मिळाले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

हे ही वाचा : मागील वर्षीच्या तुलनेत फटाके उडविण्याचे प्रमाण कमी होते. 

कोरोना प्रादूर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यात शहराचे सर्व्हेक्षण करण्यात आले. नाममात्र मानधन का होईना देण्याचे महापालिका व राज्य शासनाने याआधीच जाहीर केले होते. त्यासाठी एक हजार 559 आरोग्य कर्मचारी, 103 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी, वॉर्डनिहाय एक स्थानिक नागरिक त्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला अशा तीन व्यक्तींचा समावेश होता. 

हे ही वाचा : पिढ्यान्‌पिढ्या पोटापाण्यासाठी सुगीच्या दिवसांत स्थलांतर करणाऱ्या समाजाची दिवाळी अजूनही अप्रकाशित 

या पथकांच्या पर्यवेक्षणासाठी 15 टीममागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना प्रतिदिन 150 रुपये भत्ता देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यांनी 30 ते 50 घरभेटी याप्रमाणे घरोघरी भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयित कोरोना रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्त्वाच्या आजाराच्या व्यक्ती शोधून काढल्या. 15,323 घरांमधून 42,159 लोकांची तपासणी केली. मात्र जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या या स्वयंसेवकांना त्यांचे मानधन मिळाले नाही. सणासुदीत त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेच नसल्याने अनेकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली आहे.

महापालिकाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, काही स्वयंसेवकांच्या बॅंक खात्यांची समस्या असल्यामुळे मानधन जमा होण्यास अडचण येत आहे. अनेकांनी बंद असलेले बॅंक खाते क्रमांक दिला आहे. काही खात्याची आधारलिंक केलेली नाही. अशा विविध त्रुटी आहेत. ज्यांचे खातेक्रमांक व्यवस्थित आहेत, त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले