esakal | 55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री बनू शकतो, तर 50 नगरसेवकांत महापौर का नाही? - राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री बनू शकतो, तर 50 नगरसेवकांत महापौर का नाही? - राऊत

55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री बनू शकतो, तर 50 नगरसेवकांत महापौर का नाही? - राऊत

sakal_logo
By
सागर आव्हाड

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त मुक्त करण्यासाठी शिवसेनेचा महापौर बनवणार. जर 55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री बनू शकतो तर पन्नास नगरसेवकांत महापौर बनवणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा: भयानक! बक्षीस दिलं नाही, मुंबईत तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या बाळाची केली हत्या

पुढे ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांचे राजकीय अस्तित्व संपविल जातय अशी राजकीय चर्चा आहे, पण गोपीनाथ मुंडे यांच सामाजिक कार्य विसरता येणार नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी घोटाळ्याच्या विषया बाबदची सगळी कागदपत्रे पुराव्या निशी ED कडे पाठवले आहेत.

केंद्रीय मंत्रीमंडळात झालेल्या फेरबदलांबाबत देखील त्यांनी महत्त्वाची वक्तव्ये केली. त्यांनी म्हटलं की, नारायण राणेंवर मी टीका केली नाही तर त्यांचा गौरव केला, त्यांना जे खातं मिळेल ते तिथं ते उत्तम काम करतील, आता त्यांना देशासमोर आपलं प्रगती पुस्तक मांडायचंय. केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात दोन पैकी एकाही राजेचा समावेश का नाही, हे त्यांच्या लाखो समर्थकांनी पंतप्रधानांना विचारावं. महाराष्ट्रातील सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठीच नवं खातं काढण्यासाठी कार्यक्रम केला गेला असेल तर आम्हीही कार्यक्रम करू मात्र चांगल्या हेतून खातं निर्माण केलं असेल तर स्वागत करू आणि केंद्र सरकारचा हेतू वाईट असेल तर संघ राज्य रचनेला मोठा धोका असेल, असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा: जगातील सर्वांत खोल स्विमिंग पूल; VIDEO पाहून म्हणाल 'अद्भूत'

विधानसभा अध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याच बरोबर आमच्याही नेत्यांकडे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचे पत्ते आहेत पिंपरी-चिंचवडमध्ये इडी आणि सीबीआय येत का नाही? शिवसेना हा ओरिजनल पक्ष आहे. सतत पक्ष बदलणारे लोक स्वार्थासाठी जात असतात. प्रमुख लोक व आमदार ठेकेदारी मध्ये गुंतले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत निवडणुकीच्या वेळेस स्वबळावर लढायचं की आघाडीत यावर चर्चा करून निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image