योगी सरकारचा निषेध...निषेध...निषेध; वंचित बहुजन आघाडीची पिंपरीत निदर्शने

Pimpri_VBA
Pimpri_VBA

पिंपरी : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका दलित तरुणीवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली. मात्र, योगी सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या राज्यात दलित आणि महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला. योगी सरकारच्या निषेधार्थ शनिवारी (ता.3) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. 

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले, "पीडित तरुणीवर अत्याचार झाला असताना पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तसेच तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कुटुंबीयांना मृतदेह न सोपविता परस्पर अंत्यसंस्कार केले. काल अत्याचार झाला नाही, तर मारहाणीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर आज एसपीच निलंबन केले. या सर्व प्रकारावरून उत्तर प्रदेश सरकार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून या सरकारची मनुवादी वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.''

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अनिल जाधव, कार्याध्यक्ष धनराज बिर्दा, वाल्मीकी समाज संस्थेचे राजेश बडगुजर, महासचिव अनिल लखन, स्वराज्य अभियानाचे मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष संतोष जोगदंड, भारतीय बौद्ध महासभेचे बापूसाहेब गायकवाड, छावा युवा मराठा महासंघाचे धनाजी पाटील, महाराष्ट्र विकास समितीचे रुहीनाज शेख, वीरांगना सोशल फौंडेशनच्या दीपाली जाधव, झेप फौंडेशनचे अध्यक्ष महेश बोडखे, आराधना फौंडेशनचे अध्यक्ष महेंद्र मेनन, बेलिव्हर्स चर्च थेरगावचे पास्टर पेट्रास पंडित आदींनी सहभाग घेतला. निदर्शनावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निषेध.... निषेध..... निषेध....म्हणत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. योगी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com