

Unilateral Victories Mark NCP’s Power Show in Maval Taluka
Sakal
वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यातील पाच गट आणि दहा गण अशा सर्व १५ जागांवर दणदणीत विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. तसेच गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल-भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव केला. तर, काही कार्यकर्ते अजित पवार यांच्या आठवणींनी भावनिक झाल्याचे दिसून आले.