मावळात आज १०१ नवे पॉझिटिव्ह, तर १८० जण कोरोनामुक्त

ज्ञानेश्वर वाघमारे
Thursday, 24 September 2020

मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात १०१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात १०१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनामुक्त झालेल्या १८० जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असल्याने दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना सक्रिय रुग्णांची संख्या मात्र, कमी होत आहे. सध्या ८५४ सक्रिय रुग्ण आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत 1206 जणांचा कोरोनाने मृत्यू

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या चार हजार २०८ झाली आहे. आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला असून, तीन हजार २१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १०१ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक ३४, लोणावळा येथील २७, तळेगाव दाभाडे ग्रामीणमधील आठ, वडगाव व कामशेत येथील प्रत्येकी सहा, माळवाडी येथील चार, कुसगाव बुद्रुक येथील तीन, कुसगाव खुर्द, आर्डव व तुंग येथील प्रत्येकी दोन; कुरवंडे, इंदोरी, कान्हे, आंबी, वडिवळे, डोणे व चावसर येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' विषयावरून भाजप-शिवसेनेत रंगतोय सामना

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या चार हजार २०८ झाली असून, त्यात शहरी भागातील दोन हजार ४५१ व ग्रामीण भागातील एक हजार ७५७ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक एक हजार २८६, लोणावळा येथे ९०७ आणि वडगाव येथे रुग्णसंख्या २५८ एवढी झाली आहे. आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन हजार २१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी १८० जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ८५४ सक्रिय रुग्ण असून, त्यातील ५९६ लक्षणे असलेले व २२९ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ५९६ जणांमध्ये ४७१ जणांमध्ये सौम्य, तसेच १२३ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. दोन जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ८५४  जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 101 corona positive found and 180 patients corona free in maval