पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत 1206 जणांचा कोरोनाने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

आज 30 जणांचा मृत्यू; शहरातील 16 रुग्ण व बाहेरील 14 रुग्णांचा समावेश 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 784 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 73 हजार 260 झाली आहे. आज 1559 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 63 हजार 814 झाली आहे. सध्या आठ हजार 240 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 16 आणि शहराबाहेरील 14 अशा 30 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 206 झाली. शहरात उपचार घेत असलेल्या शहराबोहरील मृतांची संख्या 412 झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' विषयावरून भाजप-शिवसेनेत रंगतोय सामना

पिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक थेरगाव (स्त्री वय 59), कासारवाडी (पुरुष वय 75), मोशी (पुरुष वय 60), पिंपळे सौदागर (पुरुष वय 60), पिंपरी (पुरुष वय 45), निगडी प्राधिकरण (पुरुष वय 54 व 66), चिंचवड (पुरुष वय 65), भोसरी (पुरुष वय 63 व वय 50), काळेवाडी (पुरुष वय 70, स्त्री वय 65 व 60), चऱ्होली (पुरुष वय 71), दिघी (पुरुष वय 68), पिंपळे गुरव (स्त्री वय 60) येथील रहिवासी आहेत. 

भामा आसखेडमधून पिंपरी-चिंचवडसाठी जलवाहिनी टाकण्याकरिता 162 कोटींचा निधी मंजूर

'रेमडेसिव्हिर'ची जादा दराने विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक वडगाव शेरी (स्त्री वय 51), हडपसर (पुरुष वय 64), धनकवडी (स्त्री वय 45), विठ्ठलवाडी (पुरुष वय 45), जुन्नर (पुरुष वय 70 व 48), वारजे (स्त्री वय 60), पाषाण (स्त्री वय 65), खेड शिवापूर (पुरुष वय 54), करमाळा (पुरुष वय 84), देहूरोड (पुरुष वय 52), आळंदी (पुरुष वय 34) आणि खंडाळा (पुरुष वय 77) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total 1206 people died due to corona in pimpri chinchwad