पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या कमी होता होईना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (ता. 18) एक हजार 150 नवीन रुग्ण आढळले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (ता. 18) एक हजार 150 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 68 हजार 439 झाली. आज 862 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने बरे झालेल्यांची संख्या 57 हजार 914 झाली. सध्या नऊ हजार 416 रुग्ण सक्रिय आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात

शुक्रवारी 21 जणांचा मृत्यू झाला. त्यात 14 जण शहरातील असून, सात जण शहराबाहेरील आहेत. तसेच, 18 पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. शहरातील एकूण मृतांची संख्या एक हजार 109 झाली आहे. तसेच, शहरात उपचार घेतलेल्या शहराबाहेरील 335 व्यक्तींचाही आजपर्यंत मृत्यू झाला आहे. 

मावळात आज ७६ नवे पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू

आज मृत्यू झालेले नागरिक भोसरी (पुरुष वय 62, 52 व 66), देहूरोड (पुरुष वय 54 व 62), काळेवाडी (पुरुष वय 71), चिंचवड (पुरुष वय 70, स्त्री वय 72), आकुर्डी (पुरुष वय 67, स्त्री वय 70), चिखली (पुरुष वय 67), निगडी (स्त्री वय 61), सांगवी (पुरुष वय 63 व 62), मावळ (पुरुष वय 69), येरवडा (पुरुष वय 87 व 86), खेड (पुरुष वय 73), भूम (पुरुष वय 87), रायगड (पुरुष वय 57) आणि जुन्नर (पुरुष वय 63) येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 1150 corona patients found in pimpri chinchwad