esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहराने केला आज 84 हजारांचा आकडा पार 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहराने केला आज 84 हजारांचा आकडा पार 
  • आज आढळले 246 पॉझिटीव्ह रुग्ण 

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहराने केला आज 84 हजारांचा आकडा पार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 246 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 84 हजार 31 झाली आहे. आज 609 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 78 हजार 758 झाली आहे. सध्या तीन हजार 832 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील नऊ आणि शहराबाहेरील सात, अशा 16 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 441 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 566 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष भोसरी (वय 74), मोशी (वय 65), चिंचवड (वय 59), दिघी (वय 57), वाकड (वय 77), पिंपळे गुरव (वय 63). महिला अजमेरा (वय 68), चिंचवड (वय 66), घरकूल (वय 21) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष तळेगाव (वय 88), पिंपळगाव (वय 63), शिरूर (वय 58), चाकण (वय 61), बदलापूर (वय 54), देहूगाव (वय 65) आणि खेड (वय 50) येथील रहिवासी आहेत.