मावळ तालुक्यात 30 नवे पॉझिटिव्ह, तर सर्वाधिक रुग्ण तळेगावात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सुदैवाची बाब म्हणजे दोन दिवसांत मृत्यूचीही नोंद झालेली नाही.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सुदैवाची बाब म्हणजे दोन दिवसांत मृत्यूचीही नोंद झालेली नाही. शुक्रवारी दिवसभरात ३० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली. त्यातील वीस जण एकट्या तळेगावातील आहेत.  तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या १ हजार ८८४ झाली असून, आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ३८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

वडगावात 28 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचे विसर्जन

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ३०  जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक २०, कामशेत व ओझर्डे येथील प्रत्येकी दोन तर  वराळे, इंदोरी, सुदुंबरे, सावंतवाडी, काले व महागाव येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८८४ झाली असून त्यात शहरी भागातील ९८९ तर ग्रामीण भागातील ८९५   जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ६४९, लोणावळा येथे २१६ तर वडगाव येथे रुग्ण संख्या १२४ एवढी आहे. आत्तापपर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला असून १ हजार ३८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी १५ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ४२८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २९२ जण लक्षणे असलेले तर १३६ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २९२ जणांपैकी १९९ जणांमध्ये सौम्य तर ७७ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १६ जण गंभीर आहेत. सध्या ४२८  जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ.गुणेश बागडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात मू्र्तीदानाला प्रतिसाद; नियमांचे पालन करून बाप्पाला निरोप 

दरम्यान, शनिवारी (ता. २९) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद मावळ तालुक्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते लोणावळा, टाकवे खुर्द, कान्हे व तळेगाव दाभाडे येथील कोरोना उपचार केंद्रांना भेटी देणार असल्याची माहिती डॉ. लोहारे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 30 corona positive found in maval on friday 28 august 2020