esakal | पिंपरी-चिंचवड शहरात मू्र्तीदानाला प्रतिसाद; नियमांचे पालन करून बाप्पाला निरोप 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरात मू्र्तीदानाला प्रतिसाद; नियमांचे पालन करून बाप्पाला निरोप 

सहकुटुंब वाजत-गाजत, गुलालाची उधळण करीत दरवर्षी गणरायाला निरोप दिला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत साध्या पद्धतीने गणेशभक्तांनी शुक्रवारी (ता. 28) सातव्या दिवशी गणरायाला निरोप दिला.

पिंपरी-चिंचवड शहरात मू्र्तीदानाला प्रतिसाद; नियमांचे पालन करून बाप्पाला निरोप 

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : सहकुटुंब वाजत-गाजत, गुलालाची उधळण करीत दरवर्षी गणरायाला निरोप दिला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत साध्या पद्धतीने गणेशभक्तांनी शुक्रवारी (ता. 28) सातव्या दिवशी गणरायाला निरोप दिला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. त्याचप्रमाणे यंदाचा गणेशोत्सवही सध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत सरकारने आवाहन केले होते. गणरायाच्या विसर्जनासाठी नदीघाटावर गर्दी न करता घरीच करावे किंवा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर मूर्तीदान करावे, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला प्रतिसाद देत शहरातील अनेक गणेशभक्तांनी मूर्ती संकलन केंद्रावर दान केल्या.

वाकडमधील रस्त्यांचे विषय फेटाळले; सत्ताधारी भाजपने बदलली भूमिका 

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांनो! आता मास्क नसल्यास एक हजाराचा दंड 

एकाच व्यासपीठावर राजकीय विरोधकांची मांदियाळी, कुठे घडला हा चमत्कार? वाचा

महापालिका व पोलिस प्रशासनाने शहरातील सर्व विसर्जन घाट लोखंडी बॅरिकेड लावून बंद केले होते. तसेच, विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना मुख्य प्रवेशद्वारावर थांबविले जात होते. प्रवेशद्वारावर ठेवलेल्या लोखंडी टेबलवर पूजा केल्यानंतर महापालिका कर्मचारी मूर्तीचे संकलन करीत होते, तर निर्माल्याचे स्वतंत्ररीत्या संकलन केले जात होते. दरम्यान, चिंचवड येथील विसर्जन घाटावर संकलन झालेल्या मूर्तींचे वाकडमधील विनोदेवस्ती येथील खाणीत प्रशासनाकडून विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात आले. 

दोन जणांनाच परवानगी 

गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक सहकुटुंब पायी किंवा वाहनातून येत होते. मात्र, मूर्ती संकलनाच्या ठिकाणी मास्क परिधान करून दोन जणांनाच परवानगी दिली जात होती. 

बाप्पाला पावसात निरोप 

शुक्रवारी सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. दुपारपर्यंत जास्त नागरिक घराबाहेर पडले नाहीत. सायंकाळी चारनंतर विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले. दरम्यान, दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावली. 

 
मूर्ती संकलन हा उपक्रम गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सर्वांच्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठीही खूप चांगला आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. 
- सतीश कदम, गणेशभक्त, थेरगाव 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे आहे. यामुळे नदीचे प्रदूषणही कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. 
- संजय पोर्टेकर, गणेश भक्त, चिंचवड 

- सार्वजनिक गणेश मंडळापेक्षा घरगुती गणेशमूर्तींचे प्रमाण अधिक 
- सर्वत्र बॅरिकेड लावल्याने नदीघाट सुनासुना 
- ध्वनिक्षेपकावरून मूर्तीदान करण्याचे आवाहन