पिंपरी-चिंचवड शहरात 643 जणांना कोरोनाचा संसर्ग

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरात 643 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले.

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरात 643 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 34 हजार 127 झाली आहे. आज 369 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 24 हजार 41 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात 9 हजार 513 जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपासून आज रात्री नऊ वाजेपर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 573 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरामध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाने 17 मे पासून लॉकडाऊन शिथिल केले. त्यानंतर दुकाने, इंडस्ट्रीज व इतर आस्थापना उघडण्याच्या सवलती देण्यात आल्या. यामुळे नागरिकांची शहरात वर्दळ वाढल्याने तेव्हापासून पूर्वीच्या तुलनेत झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली आहे.

महापालिकेच्या वतीने शहरात कोविड केअर सेंटर व   डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आली आहेत. याशिवाय शासनाच्या निर्देशानुसार शहरातील खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड नियंत्रीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी नव्याने संशयीत रुग्णांचे जागेवरच स्वॅब घेण्यासाठी आठ स्वतंत्र टिम तयार करण्यात आल्या आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या रुग्णांकडे घरी स्वतंत्र खोलीची सोय आहे. त्यांना घरामध्येच आयसोलेशन करून उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्याशी डॉक्‍टर वेळोवेळी संपर्कात साधत आहेत. सध्या वायसीएम, एनआयव्ही, नारी, बीजे मेडिकल कॉलेज यांच्यासह आयसर, बिर्ला हॉस्पिटल, क्रष्णा डायग्नोस्टिक, वायरोप्ले, एसजी डायग्नोस्टिक, मेट्रोपोलिटीन डायग्नोस्टिक, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल या खासगी लॅबमध्ये स्वॅब तपासणी केली जात आहे.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra)मास्क जवळ बाळगावा.

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 643 corona patients found in pimpri chinchwad on saturday 15 august 2020