Breaking : पिंपरी-चिंचवडसाठी आणखी एक आदेश; आता आली नवी नियमावली

Breaking : पिंपरी-चिंचवडसाठी आणखी एक आदेश; आता आली नवी नियमावली

पिंपरी : केंद्र व राज्य सरकारचच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (रविवारी) काढले. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. १) करण्यात येणार आहे.

शहराचा समावेश नॉन रेड झोनमध्ये आहे.

संपुर्णत: प्रतिबंधीत केलेल्या बाबी :

  • शाळा, कॉलेज , शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा  
  • सिनेमा हॉल , शॉपींग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार, सर्व प्रकारचे सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा
  • सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकिय, क्रीडा,  मनोरंजन, सांकृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम  
  • सर्व धार्मिक स्थळे, सर्व धार्मिक कार्यक्रम, सभा, संमेलने बंद राहतील
  • नागरिकांच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणांशिवाय रात्री ९ ते पहाटे ५ या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहेत
  • ६५ वर्षावरील व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्त दाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, HIV बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, १० पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर  जाता येणार नाही.
     

कंटेनमेंट झोनबाबत : 

वैद्यकिय व अत्यावश्यक सेवा, तसेच अत्यावश्यक वस्तू पुरठ्याची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक वाहतूक वगळता प्रतिबंधीत क्षेत्रामधून नागरिकांना  येणे-जाणे करणेसाठी प्रतिबंध असेल. प्रतिबंधीत क्षेत्र  (कटेंनमेंट झोन) विषयक महानगरपालिकेने  वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू  अँप आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्मार्ट सारथी अँप डाऊनलोड केल्याची खात्री करुन घ्यावी. आरोग्य सेतू अँपच्या माध्यमातून रोगाची संभाव्य लागणविषयी सूचना प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. स्मार्ट सारथी अँप मध्ये कोव्हीड-१९ बाबत विविध मार्गदर्शक सूचना, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या औषधाची दुकाने, महापालिकेचे कोव्हीड-१९ फ्लू क्लिनिक या सोयीसुविधांची माहिती प्राप्त होते.

- सर्व वैद्यकिय व्यावसायिक, परिचारीका, पॅरामेडीकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अँबुलन्स यांना शहर, राज्य अंतर्गत आणि अंतरराज्य वाहतुकीसाठी परवानगी राहील.

- सर्व प्रकारचे मालवाहतुकीचे ट्रक (रिकाम्या ट्रक सह) यांना वाहतुकीसाठी परवानगी राहील.

- आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासी वाहतूक पुर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. अडकून पडलेले मजूर , प्रवासी कामगार, धार्मिक यात्रेकरु, प्रवासी यांची वाहतूक यापुर्वी वेळोवेळी केंद्र व राज्य शासनाद्वारे निर्गमित मार्गदर्शक कार्यप्रणाली नुसार अनुज्ञेय राहील.

- क्रीडा संकुले, स्टेडियम यांचे बाह्य भाग व खुली सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली राहतील. तथापि अशा ठिकाणी फक्त वैयक्तिकरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळावयाचे खेळ उदा. सायकल, जॉगींग, धावणे, चालणे, योगासने, दोरीवरच्या उड्या इत्यादींना मुभा राहील. प्रेक्षक व सामुहिक उपक्रम, सांघिक खेळ, खेळाचे साहित्य एका पेक्षा जास्त खेळाडूंनी हाताळावयाची शक्यता असलेले सर्व खेळ उदा. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो, हॉकी इत्यादी यांना परवानगी असणार नाही. अशा ठिकाणी सामाजिक / शारिरीक अंतर ठेवणे बंधनकारक असेल. सदर परवानगी सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत असेल. इनडोअर स्टेडियम किंवा स्टेडियमच्या आतील परिसरात कोणत्याही उपक्रम / कार्यक्रम / खेळ यांना परवानगी असणार नाही.

सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक खालीलप्रमाणे सुरू करता येईल :

- दुचाकी (फक्त चालक)
- तीन चाकी (चालक + दोन व्यक्ती)
- चारचाकी (चालक + दोन व्यक्ती) 

* पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रात पीएमपीएमएलच्या बस ५०टक्के एवढ्या क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करता येईल. तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांनी शारीरिक अंतराचे व स्वच्छतेच्या नियमांचे पालन बंधनकारक असेल. आंतरजिल्हा बससेवेस परवानगी नसेल.

* सर्व बाजारपेठातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान सुरू राहतील. तथापि सदर ठिकाणी गर्दी होऊन सामाजिक अंतर राखण्याचा निकषांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास बाजारपेठा  व दुकाने तात्काळ बंद करणेत येतील.तसेच मटण व चिकन विक्रीची दुकाने यापूर्वी जाहीर केलेल्या तीन दिवसांऐवजी दररोज सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहतील.

* सर्व औद्योगिक आस्थापनामध्ये कामावर उपस्थित राहणेसाठी  सर्व रेड झोन क्षेत्रांमधून येण्यासाठी महापालिकेकडून पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. उर्वरित भागातील प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंनमेट झोन) वगळता सर्व नागरिकांना पुर्व परवानगीशिवाय कामावर उपस्थित राहता येईल. 

* औद्योगिक आस्थापना १०० टक्के कामगार क्षमतेसह  सुरू ठेवता येतील. तथापि सर्व खाजगी कार्यालये व माहिती तंत्रज्ञान विषयक आस्थापना जास्तीत जास्त ५० टक्के मनुष्यबळासह सुरू करता येतील व उर्वरित मनुष्यबळाव्दारे शक्य असेल तोपर्यंत घरातून कामकाज (Work from Home) करणेस प्राधान्य द्यावे.

* बाजारपेठामधील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात सुरू राहतील. तथापि त्यासाठी पी१- पी-२ तत्वानुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम तारखेस उघडी राहतील व दुसऱ्या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. त्यामुळे अटी व शर्तीमुळे बाजारपेठामध्ये गर्दी टाळणे शक्य होईल. पर्यायाने कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध घालता येईल. तथापि, निकषांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास बाजारपेठा व दुकाने तात्काळ बंद करणेत येतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 
१) चिंचवड स्टेशन 
२) पिंपरी कॅम्प , साई चौक, शगुन चौक 
३) गांधी पेठ, चाफेकर चौक, चिंचवड 
४) काळेवाडी मेनरोड ( एम एम स्कुल ते काळेवाडी नदीवरील पुल) 
५) अजमेरा पिंपरी 
६) मोशी चौक, मोशी आळंदी रोड 
७) महाराणा प्रताप चौक, निगडी बसस्टॉप 
८) डांगे चौक ते काळेवाडी फाटा 
९) भोसरी आळंदीरोड 
१०) कावेरीनगर मार्केट 
११) कस्तुरी मार्केट, थरमॅक्स चौक ते साने चौक 
१२) दिघी जकात नाका ते मॅगझीन चौक साईबाबा मंदिर 
या विनिर्दिष्ठ बाजारपेठामधील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील .तथापि, त्यासाठी पी१, पी२ तत्वानुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम तारखेस उघडी राहतील व दुस-या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. सदर बाजारपेठामध्ये ज्या बाजुची दुकाने सुरु असतील त्याच्या विरुध्द बाजुस वाहनांचे पार्किंग करणेत यावे जेणेकरुन सुरु असलेल्या दुकानां समोरील जागा सामाजिक अंतराच्या निकषासह  ग्राहकांना वापरता येईल. 
 
कंटेनमेंट झोनबाबत :

1) अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना आदेशातून वगळण्यात आले आहे.
2) फिव्हर क्लिनीक वगळता अन्य बाह्यरुग्ण विभाग व खाजगी वैद्यकीय दवाखाने सुरु ठेवण्यास प्रतिबंधीत 
3) बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवाव्यात. ए.टी.एम.केंद्रे पुर्णवेळ कार्यान्वीत ठेवावीत.
4) सकाळी १० ते दुपारी २ या कालवधीतच दुध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील.
5) मटण व चिकन यांची किरकोळ विक्री सकाळी १० ते दुपारी २ या कालवधीतच सुरु राहील.
6) अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांची किरकोळ विक्री सुद्धा सकाळी १० ते दुपारी २ या कालवधीतच सुरु राहिल.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेनमेंट झोन वगळून क्षेत्रात : 

1) सर्व प्रकारचे दवाखाने, इस्पितळे, क्लिनिक, प्रसुतीगृहे व औषधी दुकाने  संपुर्ण कालावधीकरीता खुली राहतील.

2) शहरात मटण व चिकन यांची किरकोळ विक्री  सर्व दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत  सुरु राहील.

3) अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांची किरकोळ विक्री  शहरात  सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत  सुरु राहील. 

4) सकाळी ०९:०० ते सायंकाळी ५.०० या कालवधीतच दुध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील.  कोणत्याही हातगाडीवर खाद्य पदार्थांची विक्री करता येणार  नाही. चहा, पान व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद ठेवण्यात येईल.

5) शहरातील दुकाने, नागरी वसाहतीतील दुकाने, नागरी संकुलातील दुकाने सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत रस्त्याच्या उजव्या बाजूला सम आणि डाव्या बाजूला विषम या तारखेप्रमाणे सुरु राहतील. परंतु नागरीक सामाजीक अंतराचे पालन करत नसल्याचे  निदर्शनास आले, तर सदर भागातील सर्व बाजारपेठा व दुकाने तात्काळ बंद करण्यात येतील. 

6) अत्यावश्यक सेवांकरिता यापूर्वी पोलिसांमार्फत देण्यात आलेले पास दि. ३० जून २०२० पर्यंत लागू राहातील.

7) मोशी कृषि उत्पन्न बाजार समिती बाबत मा. विभागीय आयुक्त, पुणे यांनी पारित केलेले आदेश कायम लागू राहतील. बाजार समितीतील व्यवहारांना सदरच्या आदेशामधून वगळण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व साधारण सूचना :

1) सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील.

2) सार्वजनिक ठिकाणी थुंकणेस सक्त मनाई आहे आणि त्याचे उल्लंघन

केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कार्यवाहीस पात्र राहील.

3) सार्वजनिक ठिकाणी दोन गज इतके अंतर राखणे बंधनकारक राहील.

4) लग्न समारंभामध्ये सामाजिक अंतर राखून जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील.

5) अंत्यविधी कार्यक्रमासाठी सामाजिक अंतर राखून जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील.

6) सार्वजनिक ठिकाणी गुटखा, पान तंबाखू  खाणेस व मद्यपानास सक्त मनाई राहील.

7) सर्व दुकानामध्ये दोन्ही ग्राहकामध्ये सुरक्षित अंतर ६ फुट राखणे बंधनकारक राहील.

8) ज्या आस्थापनांमध्ये शक्य असेल तोपर्यंत घरातून कामकाज (Work from Home)करणेस प्राधान्य द्यावे.

9) सर्व कार्यालये , दुकाने , कारखाने, व्यापारी आस्थापना इत्यादी ठिकाणी कामाच्या वेळेचे सक्त पालन करावे.

10) इमारतींमध्ये आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर या करिता व्यवस्था करणेत यावी.

11) संपुर्ण कार्यालयामधील  सार्वजनिक जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग जसे की दाराचे हॅन्डल इत्यादीचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे.

12) कार्यालय प्रमुखांनी कार्यालयामध्ये शारीरीक अंतर , कार्यरत कर्मचा-यामध्ये योग्य अंतर , दोन शिफ्ट मध्ये पुरेसा वेळ , जेवणाचे सुट्टीचे नियोजन योग्य प्रकारे होईल याची दक्षता घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com