पिंपरी-चिंचवड शहरात बेवारस वाहनांचा लिलाव अद्याप नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

पिंपरी शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’चे काम सुरू असून, आता शहर हरतऱ्हेने स्वच्छ करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, मोकळ्या जागेत धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मात्र, वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने लिलाव करण्यास अडचण येत आहे.

वाहतूक, उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद नसल्याने अडचण
पिंपरी - शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’चे काम सुरू असून, आता शहर हरतऱ्हेने स्वच्छ करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, मोकळ्या जागेत धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मात्र, वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने लिलाव करण्यास अडचण येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक रस्ते, आडरस्ते, उड्डाणपुलाखाली, आडोशाला बरीच वाहने बेवारस अवस्थेत पडलेली दिसतात. अनेक वाहनांचे सांगाडे झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होतो. अस्वच्छता देखील पसरत आहे. याबाबत महापालिका, वाहतूक विभाग आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे अशी वाहने जप्त केली आहेत. यामध्ये रिक्षा, दुचाकी, चारचाकी, मोटार, ट्रक, मिनी बस, अशा तब्बल ४७५ वाहनांचा समावेश आहे. यापूर्वीही महापालिकेने अशी मोहीम राबविली होती. ही वाहने अद्यापही तशीच पडून आहेत. 

पिंपरी-चिंचवड : दिवाळीनंतर खवय्यांचा पुन्हा मटण, चिकनवर ताव

कचरा डेपोजवळील खाण परिसरात ही वाहने ठेवली आहेत. आरटीओतील नोंदीनुसार संबंधित वाहनमालकांना नोटीस बजावल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे लिलावाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका, वाहतूक विभाग आणि आरटीओ या तिन्ही विभागाच्या वारंवार बैठका घेतल्या आहेत. सरकारच्या नियमानुसार लिलाव करावा लागणार आहे. मात्र, वाहतूक आणि आरटीओकडून अशा वाहनांची माहिती मागवली आहे. परंतु, अद्याप ती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे जप्त वाहनांचा तूर्तास लिलाव होणार नसल्याचे सहशहर अभियंता श्रीकांत सवाने यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 246 नवीन रुग्ण; तर सात जणांचा मृत्यू

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no auction of unattended vehicles in Pimpri Chinchwad yet