esakal | पुणे - नाशिक महामार्गावर नो बॅरिकेड.. नो टोल.. | Pimpri
sakal

बोलून बातमी शोधा

toll

पुणे - नाशिक महामार्गावर नो बॅरिकेड.. नो टोल..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोशी : पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या मोशी उपनगरातील टोल नाका शनिवारी (ता. 9) बंद झाला. या प्रकल्पाची मुदत शुक्रवारी (ता. 8) संपली आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील या टोलनाक्यावर ना बॅरिकेट.. ना टोल वसूली... त्यामुळे येथे थांबावे न लागल्याने वाहन सुसाट झाली आहेत.तसेच वाहनचालकांनाही वाहतूक कोंडी व टोल पासून दिलासा मिळला आहे.

मोशीतील टोलनाक्यावर नाशिक, संगमनेर, आळेफाटा, खेड, जुन्नर, आंबेगाव आदी भागाकडून पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहराकडे ये-जा करणारी शेकडो वाहने या टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबत असत. त्यातच पिंपरी चिंचवड व चाकण आदी औद्योगिक वसाहतीकडेही ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांचीही या ठिकाणी मोठी वर्दळ होती. या टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबावे लागत असल्यामुळे येथील वाहनचालकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.

शुक्रवारी आयआरबी कंपनीने आपली टोल वसुलीची मुदत संपल्याने टोलनाक्यावर आयआरबी कंपनीने टोल नाका बंद केल्याविषयी संबंधीत सूचना फलक लावला असून आता टोलनाक्यावर कर्मचारीही नाहीत, टोलही नाही व वाहतूक कोंडी ही नाही. त्यामुळे आता वाहन चालक येथून आपली वाहने सुसाट हाकत आहेत.

हेही वाचा: शाळेचे वर्ग अद्याप शाळेच्या ताब्यात नसल्याने शाळा बंदच

आठवड्यातून दोन ते तीन वेळा आळेफाटा याठिकाणी गावी ये-जा करावी लागते. या ठिकाणी टोल भरायला थांबल्यावर दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक कोंडी मध्ये थांबावे लागत होते मात्र आता हा टोल नाका बंद झाल्याने आम्हा वाहनचालकांचा वेळ, पैसा व इंधन वाचणार आहे.

राहुल आवटी, उद्योजक, भोसरी

लखीमपूरमधील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुरु असलेल्या बंदचा मोशी मध्ये काहीही परिणाम जाणवला नाही. कारण पुणे नाशिक महामार्गाने नेहमीचीच वाहतुक सुरु होती तर दुकानेही उघडीच होती.

loading image
go to top