मावळ तालूक्यात काल एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

Corona
Corona

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात रविवारी दिलासादायक बाब घडली आहे. दिवसभरात एकही जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. कोरोनामुक्त झालेल्या सात जणांना घरी सोडण्यात आले. 

तालुक्यात ७ मे ला पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर गेल्या आठ महिन्यात शहरी व ग्रामीण भागात सातत्याने कोरोना रुग्ण आढळून येत होते. आत्तापर्यंत शहरी भागात सुमारे साडेचार तर ग्रामीण भागात सुमारे साडेतीन हजार रुग्ण आढळले आहेत. विशेषतः तळेगाव दाभाडे व  लोणावळा येथे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अधिक होते. रविवारी तालुक्यात एकही रुग्ण न आढळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.  

तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ७ हजार ८८१ असून त्यातील ७ हजार ६३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.  आत्तापर्यंत २२३ जणांचा मृत्यु झाला आहे. सध्या २८ सक्रिय रुग्ण असून त्यातील २२ जण लक्षणे असलेले तर सहा जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २२ जणांमध्ये १८ जणांमध्ये सौम्य तर तीन जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. एक जण अत्यवस्थ आहे. सक्रिय २८ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com