गावाला रस्ताच नसल्याने कावडीतून होतेय दुधाची वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

गावात रस्ता नाही, त्यामुळे कावडीला दोन घागरी बांधून पायथ्यापर्यंत दुध आणावे लागते. गेल्या साठ वर्षांपासून अशापद्धतीने आमची पायपीट सुरू आहे. हा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. गावापर्यंत रस्ता झाल्यास आमची पायपीट थांबेल, असे उर्से ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरवाडी ग्रामस्थांनी सांगितले.

बेबडओहोळ - गावात रस्ता नाही, त्यामुळे कावडीला दोन घागरी बांधून पायथ्यापर्यंत दुध आणावे लागते. गेल्या साठ वर्षांपासून अशापद्धतीने आमची पायपीट सुरू आहे. हा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. गावापर्यंत रस्ता झाल्यास आमची पायपीट थांबेल, असे उर्से ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरवाडी ग्रामस्थांनी सांगितले. 

अ‍ॅपवरील ओळखीतून केला विधवेवर बलात्कार

उर्से हद्दीत व द्रुतगती महामार्गालगत डोंगरवाडी गाव आहे. उंचावर वसलेले. गेल्या साठ वर्षात सुविधा न मिळाल्याने काही कुटुंबांनी पायथ्यालगतच्या अन्य गावांमध्ये स्थलांतर केले आहे. रस्ता नसल्याने ग्रामस्थांची हेळसांड होत आहे. दुध व्यवसायावरच गावातील सर्व कुटुंबांचा गाडा चालत आहे. दररोज तरुणांना दुधाच्या घागरी घेऊन दीड किलोमीटर धोकादायक पद्धतीने उतरावे लागते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कावड करून त्यात दोन घागरी दुधाच्या भरून खाली उतरावे लागते. हा प्रवास गेली कित्येक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षी रस्त्याचे काम झाले. डोंगरभागात खोदकाम करून रस्ता केला. मात्र, पावसामुळे काही ठिकाणी तो खचला आहे. काही ठिकाणी मुरूम ढासळला आहे. यामुळे रस्त्याचा वापर ग्रामस्थांना करता येत नाही. रस्त्याचे चांगले डांबरीकरण होणे आवश्‍यक आहे. या कामाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्ता लवकर झाल्यास आमची पायी दुध वाहतूक थांबेल, असे तुकाराम नवघणे, नारायण भोसले, स्वप्नील नवघणे या तरुणांनी सांगितले.

रस्त्यावर शतपावली करीत असताना तरुणावर झाला गोळीबार

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no road village milk is transported through Yoke