अ‍ॅपवरील ओळखीतून केला विधवेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

टिंडर डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाल्यांनतर त्याचा गैरफायदा घेत तरुणाने विधवा महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपरी - टिंडर डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाल्यांनतर त्याचा गैरफायदा घेत तरुणाने विधवा महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

चिंचवड : उड्डाणपुलावरून उडी मारून केली आत्महत्या

अमन दीपक सिंग (वय 29, रा. डांगे चौक, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 12 जून ते 24 सप्टेंबर 2020 या कालावधीत ताथवडे, पुनावळे, मारुंजी, विनोदे वस्ती हिंजवडी या ठिकाणी घडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपी अमन आणि पीडित महिलेची ओळख टिंडर या डेटिंग अ‍ॅपवरून झाली. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर अमन याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. महिला विधवा असल्याचे माहिती असताना अमन याने तिला ताथवडे, पुनावळे, मारुंजी, हिंजवडी येथील विविध हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. महिलेने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने महिलेच्या तोंडावर बूट फेकून मारला आणि लग्नास नकार दिला.

घरात राहू दिले नाही म्हणून माय लेकराचा खून

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Widow raped by acquaintance on app crime