रस्त्यावर शतपावली करीत असताना तरुणावर झाला गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

रस्त्यावर शतपावली करीत असलेल्या तरुणावर अनोळखी व्यक्तीने गोळीबार केला. ही घटना जुन्या संगावीतील आनंदनगर येथे घडली असून यात तरुण जखमी झाला आहे.

पिंपरी - रस्त्यावर शतपावली करीत असलेल्या तरुणावर अनोळखी व्यक्तीने गोळीबार केला. ही घटना जुन्या संगावीतील आनंदनगर येथे घडली असून यात तरुण जखमी झाला आहे.

चिंचवड : उड्डाणपुलावरून उडी मारून केली आत्महत्या

आनंद ललित कुमार सोळंकी (वय 30, रा स्पायसर कॉलेज रोड, जुनी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी आनंद हे शनिवारी (ता.9) रात्री दहाच्या सुमारास त्यांची पत्नी व शेजारील एका चार वर्षांच्या मुलीला घेऊन शतपावली करण्यासाठी रस्त्याने पायी चालत जात होते. जुन्या संगावीतील मुळा नगर रोडने जात असताना एक अनोळखी व्यक्ती आनंद यांच्या पाठीमागून आला. त्या अनोळखी व्यक्तीने पाठीमागून आनंद यांच्यावर गोळी झाडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही गोळी आनंद यांच्या कानाला लागली आहे. त्यांना उपचारासाठी औंध येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

घरात राहू दिले नाही म्हणून माय लेकराचा खून

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth firing doing centipede on the road crime