Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो आज अन् उद्याचा दिवस पाण्याविना काढावा लागणार, कारण...

Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो आज अन् उद्याचा दिवस पाण्याविना काढावा लागणार, कारण...
Updated on

पिंपरी : महावितरणचा फिडर शुक्रवारी (ता. 4) रात्री बंद पडला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या रावेत अशुद्ध जल उपसा केंद्रातील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी अशुद्ध जल उपसा बंद झाला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. 5) शहरातील पाणीपुरवठा बंद राहील, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी कळविले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जल उपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पंप हाऊस उभारले आहे. त्यातून वीस पंपाद्वारे अशुद्ध पाणी उचलून पाईपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर 22 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. शुध्द केलेले पाणी वेगवेगळ्या भागातील टाक्यांमध्ये पोचवून त्याद्वारे शहरात वितरित केले जाते.

रावेत बंधारा येथून दररोज सरासरी 510 दशलक्ष लिटर अशुद्ध जल उपसा केला जातो. मात्र, समन्याय पद्धतीने सर्वांना समान पाणी मिळावे, यासाठी गेल्या 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय गुरुवारी रावेत अशुद्ध जल उपसा केंद्र, निगडी जल शुद्धीकरण केंद्र व शहरातील काही ठिकाणच्या पाणी वितरण यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित झाला. आता वीजपुरवठा खंडित झाल्याने अशुद्ध जल उपसा बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.

दरम्यान, महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी कळविले आहे की, काल दि. ०४/०९/२०२० रोजी रात्री ११.०० वाजता MSEDCL चा फिडर नादुरुस्त झाल्याने रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्र येथील विद्युतपुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग  बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील आजचा म्हणजेच शनिवार ५  सप्टेंबर २०२० रोजीचा दिवसभराचा तसेच, उद्या रविवार ६ सप्टेंबर २०२० रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील. MSEDCL मार्फत दुरुस्तीचे काम सुरू असून, विद्युतपुरवठा पूर्ववत झाल्यावर पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी नागरिकांनी याची नोंद  घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com